जुना देशी-विदेशी माल शिल्लक असल्यावर देखील जुन्या रेट नुसार न देता प्रिंट रेट वरती देखील 10, 15 ,20 रुपये जास्त घेत असल्याची तक्रार
! 
प्रतिनिधी :- पारोळा शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसापासून मद्यपींची लूट होत आहे याबाबत असे की पारोळा शहरातील देशी-विदेशी दारू दुकान व वाईन शॉप मध्ये गेल्या काही दिवसापासून जुना देशी-विदेशी माल शिल्लक असल्यावर देखील जुन्या रेट नुसार न देता प्रिंट रेट वरती देखील 10, 15 ,20 रुपये जास्त घेत असल्याची तक्रार मद्यपींची असून याबाबत शहरातील व शहराबाहेरील वाईन शॉप व देशी दारू दुकानदार रेट पेक्षा दहा ते पंधरा वीस रुपये जास्त घेत असल्याची तक्रार आता येथील मद्यपी जिल्हाधिकारी व दारूबंदी अधीक्षक जळगाव यांच्याकडे ऑनलाइन पद्धतीने करणार असून याबाबत काही मद्यपींनी दुकानदारांकडे तक्रार व काही अशील भाषेत शिवीगाळ देखील केल्याचे समजते. ?
परंतु दुकानदाराने देखील कुठेही तक्रार केलेली नसून जास्त भावाचे पैसे घेत असून याबाबत, शांताराम पाटील, मुकेश नाईक, जगन्नाथ भिल , सह इतर काही मद्यपी हे ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी व दारूबंदी , अधीक्षक जळगाव यांच्याकडे ऑनलाइन रीतसर तक्रार करणार असल्याचे कळते ?
मात्र यावेळी वाईन शॉप व किरकोळ विक्रेते देशी दारू यांनी कोणतेही तक्रार केली नसल्याचे दिसून येत आहे परंतु असेच जर जास्त पैसे मद्यपींकडून घेत असतील तर यापुढे देशी दारू दुकान व वाईन शॉप वरती काही वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही कमी जास्त अनुचित प्रकार घडल्यास यास कोण जबाबदार राहणार दुकानदार की जिल्हाधिकारी किंवा जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी तसेच वाईन शॉप व देशी-विदेशी दारू दुकानदारांनी दारू बाटली चे रेट भाव फलक दुकानाबाहेर लावल्यास असे गंभीर परिणाम व वाद घडणार नाहीत अशी देखील काही मद्यपींची मागणी आहे व ती देखील रीतसर असून याबाबत जिल्हास्तरावर योग्य विचार व्हावा असे देखील काही मद्यपींनी सांगितले ,परंतु आज येणारा वाद टाळण्यासाठी देशी-विदेशी वाईन शॉप देशी दुकान वरती प्रिंट रेट नुसारच दारू विकली जावी , अशी मागणी काही मद्यपिंनी केलेली आहे या कारणामुळे जळगाव जिल्ह्यात होते तेही देशी विदेशी दारू ची होत आहे जादा भावाने विक्री! यापुढे नवरात्र उत्सव व पारोळा शहरातील रथोत्सव देखील येत आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वाईन शॉप बिअर शॉपी व देशी दारू दुकानदार बियर बाहरवाले यांच्या वरती देखील योग्य वचक जिल्हाधिकारी सो पोलीस अधीक्षक सो व दारूबंदी अधीक्षक यांनी ठेवावा जेणेकरून पारोळा शहर व तालुक्यातील शांततेला गालबोट लागणार नाही शासनाने योग्य ती दाखल घ्यावी अशी रास्त मागणी होत आहे.