Ankush tv18 news network
अकोट प्रतिनिधी….. निळकंठ वसू पाटील
महाराष्ट्र मध्ये सतत च्या पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आढळून येतो. पावसात खंड नसल्याने शेतकऱ्यांना तणांचा बंदोबस्त करणे कठीण होत आहे.तणांचा बंदोबस्त करण्याकरिता महाराष्ट्रातील बरेच शेतकरी तननाशकला सहनशील असलेले कापसाचेअनधिकृत HT bt बियाणे लागवड करीत आहे.विदर्भातील प्रमुख पीक कपाशीचे आहे.सातत्याने या बियांना ला सरकार ने परवानगी द्यावी. अशी मागणी जोर धरत आहे. याच अनुषंगाने प्रतापराव जाधव यांची भेट घेतली.या वाण संबंधित चर्चा झाली.या वानाला सरकारी मान्यता नसल्याने या मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.या नवीन कापसाच्या वाणांमुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होत आहे.यावर सकारात्मक विचार मंत्री महोदयांनी वक्त केले. तसेच आरोग्या संबंधित वेगवेगळ्या योजनांची माहिती मंत्री महोदयांनी दिली.यावेळी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर,शेतकरी संघटनेचे संथापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,कार्यध्यक्ष कालिदास आपेट, नानासाहेब क्रांती ब्रिगेड चे शिवाजीराव नादखीले,पंकज माळी,आदी उपस्थित होते.