Ankush tv18 news network
मुक्ताईनगर
मुक्ताईनगर मध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला अन्नपदार्थ साठा वाहतूक होणार आहे बाबत माहिती मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, येथील पोउपनि. सोपान गोरे यांचे नेतृत्वात पोहेकी सलीम तडवी, पोकी छगन तायडे, पोकों/रतन गिते, पोकों/मयुर निकम, चापोहेको भरत पाटील यांचे पथक तयार करुन त्यांना छापा कारवाई करुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेशीत केले.
मा. बरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पोउपनि, सोपान गोरे व पथकातील पोलीस अंमलदार यांनी अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभा, जळगांव तसेच पंच यांचेसह मुक्ताईनगर येथे जावुन सारोळा फाटा येथे नाकाबंदी करून सापळा रचुन मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला अन्न पुरवठा करणारे वाहन ताब्यात घेवून बाहनासह एकुण १,०२,३३४६०/- रु. चा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला अन्नपदार्थ साठा (गुटखा) मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी नामे १) आशिष राजकुमार जयस्वाल रा. ग्राम भमोरी, वार्ड नं. १४ देवास, मध्यप्रदेश २) आशिफ खान बुल्ला खान रा. शिवश्क्ती नगर, दत्तवाडी, नागपुर यांचे विरुध्द मुक्ताईनगर पो.स्टे. येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक सो., जळगांव, डॉ महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि, सोपान गोरे, पोहेको सलीम तडवी, पोकों/छगन तायडे, पोकों/रतन गिते, पोकों/मयूर निकम, चापोहेको भरत पाटील स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी केली आहे.