ANKUSH TV18 NEWS NETWORK
शिमला जिल्ह्यातील रामपूर
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यातील 05 (हिंदुस्तान-तिबेट मार्ग) वरील बिथल (कालीमिट्टी) परिसराजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात सौ. लक्ष्मी विराणी (जळगाव, महाराष्ट्र) यांचे अकाली निधन झाले आहे.मुसळधार पावसामुळे डोंगरावरून अचानक घसरलेले प्रचंड दगड एका खासगी बसवर कोसळले. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सौ. लक्ष्मी विराणी यांचा समावेश आहे. १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
घटनेनंतर त्वरित पोलीस व बचावदल घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी प्रवाशांना महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्र, खानरी (रामपूर उपजिल्हा) येथे तात्काळ दाखल करण्यात आले. मृतदेह सध्या रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून वैद्यकीय नियमांनुसार उद्या सकाळी शवविच्छेदन करण्यात येईल. त्यानंतर सौ. विराणी यांचा मृतदेह त्यांच्या कार्यस्थळी सहकारी श्री. तरुण रामचंदानी (वय २६) यांच्या ताब्यात देण्यात येईल व पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येईल.
घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा प्रशासनाने शिमला जिल्हा प्रशासन तसेच हिमाचल प्रदेश शासनाशी तातडीने संपर्क साधला.