ANKUSH TV18 NEWS NETWORK
मानवत / बातमीदार.
{ अनिल चव्हाण. }
के. के. एम. महाविद्यालया मध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळ प्रमुख उपस्थिती. सी.ए. ( CA.) श्री निलेश लड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सी.ए. (CA ) च्या अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रिया याबाबत व इंडियन चार्टर्ड अकाउंट इन्स्टिट्यूशनच्या कार्य प्रणाली विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाला के.के.एम. महाविद्यालयाचे वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख डॉ के. बी. पाटोळे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विनोद हिबारे यांनी केले. वाणिज्य शाखेतील डॉ. बी. एस. गिते, डॉ एस. आर. राठी यांची उपस्थिती होती. तर ऊपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती एस. बी. घनवट यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थीमोठ्या संख्येने उपस्थित होते.