ANKUSH TV18 NEWS NETWORK
अवैधरीत्या अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याचे उद्देशाने बाळगुन असलेल्या इसमांवर एनडीपीएस अॅक्ट अन्वये कारवाई करुन ०२ आरोपी अटक करुन १९४३४०/- रु चा मुद्देमाल हस्तगत केले वावत.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संदीप पाटील सो. यांना देवून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी फैजपुर पो.स्टे. येथे जावून प्रभारी अधिकारी फेजपुर पो.स्टे. श्री सपोनि रामेश्वर मोताळे व पो.स्टे. नेमणुकीचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच श्री रंगनाथ धारबळे, पोलीस निरीक्षक, यावल पो.स्टे. वांचे मदतीने एनडीपीएस अॅक्ट अन्वये सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन पो. स्टाफ व शासकिय पंच यांचे सह जावुन छापा कारवाई केली असता न्हावी गावातून जानोरी गावाकडे जाणारे रस्त्याचे लगत असलेल्या किशोर भागवत पाटील रा. न्हावी ता. यावल जि. जळगांव यांचे शेतात पत्र्याचे घरामध्ये आरोपी नामे १) रगन सुकराम बारेला वय ३२ वर्ष रा. महादेव शिरवेल, ता. भगवानपुरा जि. खरगोन (मध्यप्रदेश) ह.मु. किशोर भागवत पाटील याचे न्हावी गावातून जानोरी गावाकडे जाणारे रस्त्याचे लगत असलेल्या शेतातील पत्र्याचे घरात २) अझरुद्दीन अब्दुल वाहिद कुरेशी वय २७ वर्ष रा. सिध्दबलपुर, एलहंका, बेगलुरु अर्बन (कर्नाटक) हे अवैधरीत्या ९ किलो ७१७ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा किंमत १,९४३४०/- रु किंचा विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःजवळ बाळगुन असतांना मिळुन आल्याने त्यांचेजवळुन जप्त करण्यात आला असुन नमुद दोन्ही आरोपी यांचे विरुध्द फैजपुर पो.स्टे. येथे एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक सो, जळगांव, डॉ महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपुर उपविभाग, श्री अनिल बडगुजर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि, रंगनाथ धारबळे, यावल पो.स्टे. यांचे संपुर्ण उपस्थितीमध्ये सपोनि रामेश्वर मोताळे, प्रभारी अधिकारी, फैजपुर पो.स्टे. पोउपनि. शरद वागल, स्थागुशा, जळगांव, पोउपनि, निरज बोकील, पोउपनि विनोद गाभणे फैजपुर पो.स्टे., पोहेको/प्रविण भालेराव, पोहेको मुरलीधर धनगर, पोको सिध्देश्वर डापकर, पोकों/गोपाल पाटील, चापोकों/महेश सोमवंशी सर्व स्थागुशा, जळगांव तसेच सफौ देविदास सुरदास, पोहेकों/देवेंद्र पाटील, पोहेकॉ विकास सोनवणे, पोकों/ भुषण ठाकरे सर्व फैजपुर पो.स्टे. यांनी संयुक्तीकरित्या केली आहे.