एमसीसीच्या दिरंगाईमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाची दुसरी फेरी लांबणीवर
नवी दिल्ली – वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. मेडिकल काउन्सेलिंग कमिटी (MCC) कडून दिरंगाई होत असल्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसरी फेरीची काऊन्सेलिंग लांबणीवर टाकण्यात आली आहे.
पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीची उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र, अजूनपर्यंत एमसीसीकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंतेचं वातावरण आहे.
तज्ज्ञांच्या मते, कागदपत्रांच्या पडताळणीतील विलंब आणि तांत्रिक कारणांमुळे प्रक्रिया अडथळ्यात आली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन अडचणीत आले असून, खासगी महाविद्यालयांच्या शुल्क संरचनेबाबतही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, पालक आणि विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार व एमसीसीकडे लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू करण्याची मागणी केली आहे.