मोटार सायकल चोरीचे गुन्हे प्रमाण वाढत असल्याने मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याचे सुचना -ना. पोलीस अधिक्षक श्री माहेश्वर रेड्डी
दिनांक 01/08/2025 रोजी रात्री 09.00 ते 11.00 वा. च्या सुमारास फिर्यादी हा त्याची ऍक्टीव्हा क MH-19,BR-8538 ही एच.डी.एफ.सी. बैंक पांडे चौक येथे लावुन सरकारी दवाखाण्यात गेला असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचे संमतीवाचुन लबाडीने मोटार सायकल चोरुन नेल्याचे फिर्याद बरुन पोस्टें एम.आय.डी.सी. येथे गुरन 592/2025 कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल.
मोटार सायकल चोरीचे गुन्हे प्रमाण वाढत असल्याने मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याचे सुचना ना. पोलीस अधिक्षक श्री माहेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते यांनी दिल्या सदर बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदिप गावीत व पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, स. फौ. विजयसींग पाटील, पो. ना. प्रदिप चौधरी, पोकों विशाल कोळी अशांचे पथक नेमण्यात आले. सदर चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा शोध घेत असतांना गोपनीय बातमीदारामार्फत पोना/प्रदिप चौधरी, पोकों विशाल कोळी यांना माहिती मिळाली कि, चोरीला गेलेली ऍक्टीव्हा ही रामेश्वर कॉलणी जळगांव येथे आहे. त्यावरुन माहिती घेतली असता सदरची मोटार सायकल अनुराग जाधव वापरत आहे. अधिक तपास केला असता आरोपी नामे अनुराग जाधव रा. रामेश्वर कॉलणी जळगांव याने मोटार सायकल चोरल्याचे निषन्न झाल्याने त्यास दिनांक 19/08/2025 रोजी अटक करुन त्यास एक दिवस पि.सी. आर. घेवुन दरम्यान आरोपीकडुन ऍक्टीव्हा क्रं. MH-19,BR-8538 ही हस्तगत करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोना प्रदिप चौधरी हे करीत आहे.