ANKUSH TV18 NEWS NETWORK
रात्रीचे वेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहनाचे डॅशबोर्डचे डिक्कीतुन रुपये 5000/- रोख रक्कम व कागदपत्रे बळजबरीने काढुन जबरी चोरी
दिनांक 17/08/2025 रोजी रात्री 01.00 वाजेच्या सुमारास तक्रारदार नामे रोहित प्रकाश रल वय 24 वर्षे धंदा ड्रायव्हर मुळ रा. चोपडा हे त्यांचे ताब्यातील महींद्रा पिकअप मालवाहतुक गाडीतुन रावेर ते चोपडा हायवेने यावल शहरातील बुरुज चौकातील ब-हाणपुर जलेबी सेंटर समोर त्यांचे वाहन दोन अनोळखी इसमांनी थांबवून त्यांचे वाहनाचे डॅशबोर्डचे डिक्कीतुन रुपये 5000/- रोख रक्कम व कागदपत्रे असलेली पिशवी बळजबरीने काढुन तक्रारदार यांना चापटा बुक्क्यांनी मारहान करुन जबरी चोरी करून घेवून गेलेले असल्याने दिनांक 17/08/2025 रोजी यावल पोलीस स्टेशन येथे 02 अनोळखी चोरट्यांविरुध्द गुन्हा रजी.नं. 342/2025, भारतीय न्याय संहीता कलम 309 (4),309(6), 3(5) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा हा रात्रीचे वेळी राष्ट्रीय महामार्गावरील घडलेला असुन सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी सो., मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते सो. तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना दिलेल्या होत्या त्यानुसार गोपनीय माहीतीचे आधारावर तसेच घटनेचे वेळी जवळपास हजर असलेल्या स्थानिक रहीवाशी यांना केलेल्या विचारपुस अंती सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला असुन सदर गुन्हा आरोपी क्र. 1 नामे समशेर शहा सलीम शहा वय-27 वर्षे, रा. बाहेरपुरा यावल मुळ रा. पंचशीलनगर भुसावळ जि. जळगाव व त्याचा साथीदार नामे समीर रहेमान तडवी वय 22 वर्षे रा. तडवी कॉलनी, यावल ता. यावल जि. जळगाव यांनी केलेला असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी नं. 1 यास गेंदालाल मिल जळगाव येथुन ताब्यात घेतलेले असुन आरोपी नं.2 यास यावल येथुन ताब्यात घेवून दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यात जबरी चोरी केलेले रुपये 5000/- रक्कम हस्तगत करण्यात आलेली असुन पुढील तपास पो. नि. रंगनाथ धारबळे हे करीत आहे. यातील आरोपी समशेर शहा सलीम शहा हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशन येथे चोरीचे तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ येथे जबरी चोरी, घरफोडी तसेच विनयभंग अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगीरी ही पो.नि. रंगनाथ धारबळे यांचे नेतृत्वात स. फौ. विजय पाचपोळे, पोहेकों वासुदेव मराठे, पोहेकॉ निलेश चौधरी, पोना अमित तडवी, पोकों अर्षद गवळी, पोकों ऐजाज गवळी, पोकों अनिल साळुंखे, पोकों सागर कोळी नेमणुक यावल पो. स्टे. यांनी केलेली आहे.