मुंबई, ( ankush tv 18 news ) आरबीएल बँकेतील माजी कर्मचारी डॉली कोटक हिला तिच्या माजी सहकाऱ्याला खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवून १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी गुरुवारी अटक केली. डॉली कोटक हिने इतर तीन सहकाऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीरपणे त्या जोडीदाराची खासगी माहिती मिळवली, त्याच्या कुटुंबाला धमकावल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणात सहभागी असलेल्या सहा जणांची नावे न्यायालयाने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आहेत, त्यात तिचा भाऊ सागर कोटकचा समावेश आहे, जो सध्या वेगळ्या पोक्सो प्रकरणात जामिनावर आहे. मे २०२४ मध्ये, त्या सहकाऱ्याला डॉली कोटकच्या नंबरवरून एक धमकीचा संदेश आला होता. बलात्काराचा खोटा गुन्हा; डॉलीला अटक न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा वारंवार छळ होऊन पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने बोरिवली दंडाधिकाऱ्यां याचिका दाखल केली. त्यांनी चारकोप पोलिसांना भारतीय नागरी सुरक्षा संहिताच्या कलम १७५ (३) अंतर्गत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात, पोलिसांनी डॉली अरविंद कोटक, एचडीएफसी बँकेचे संबंधित कर्मचारी प्रमिला वास आणि सागर अरविंद कोटक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.