Jalgaon ( Mrs. Bharti Sarwane )
दि. १६/०४/२०२५ रोजी रात्री ०८.०० ते दि. २७/०४/२०२५ रोजीचे दुपारी ०४.०० वा. पावेतो एम.आय.डी.सी परीसरातील जगवाणी नगरच्या गेटसमोर असलेल्या दुकान नं ०४ चे शटर वाकवुन त्यातुन १८५०००/- रुपये किंमतीचे जुने व नवे तांब्याचे तार चोरी करणा-या अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्यादी यांनी तक्रार दिल्यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे CCTNS गुरन ३०२/२०२५ भारतिय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासकामी मा. बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोउनि राहुल तायडे, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना/प्रदीप चौधरी, पोकों/निलेश पाटील अशांचे पथक नेमण्यात आले होते.
सदर गुन्ह्यात दोन आरोपीतांना दि.०२/०५/२०२५ रोजी अटक करण्यात आली होती. परंतु सदर गुन्ह्यातील आरोपी क्र. ०३ शिकवणसिंग बरियामसिंग उर्फ पटमलसिंग टाक हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता. तो दि.०४/०८/२०२५ रोजी वाघनगर परिसरात फिरत असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत सफौ/विजयसिंग पाटील व पोना/प्रदिप चौधरी यांनी माहीती मिळाल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेवुन गुन्ह्यात हजर केले. त्यानंतर त्याची दोन दिवसाची पोलीस कस्टडी घेण्यात आली असुन कस्टडी दरम्यान त्याने २७०००/- रुपये किंमतीचे ५० किलो वजनाचे जुने व नवे तांब्याचे तार काढुन दिल्याने सदरचा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे. गुन्हाचा पुढील तपास पोउपनिरि/राहुल तायडे व पोकों/निलेश पाटील हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते सो, पोलीस उप अधीक्षक श्री संदीप गावीत सो, पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात आली आहे.