.Jalgaon ( Mrs. Bharti Sarwane ) दिनांक ०५/०८/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांचे कडे तपासावर असलेला पावल पो.स्टे. CCTNS No. २९७/२०२५ भा.न्या. संहिता कलम १०९(१), ३ (५), आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे चे गुन्हयातील निष्पन्न आरोपी यास सखोल विचारपुस करीत असतांना त्यांने जळगांव येथील अक्षय अजय जयस्वाल रा. शिवाजी नगर, जळगांव यास एक देशी बनावटीचे पिस्टल विक्की केले असल्याबाबत सांगितल्याने श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी स्थानीक गुन्हे शाखेचे पोठपनि, शरद बागल यांचे नेतृत्वात एक पथक तयार करुन नमुद इसमाचा शोध घेवुन कायदेशीर कार्यवाही करणे बाबत आदेशीत केल्याने पोउपनि, शरद बागल व पथकातील पोलीस अंमलदार यांनी अजय जयस्वाल याचा जळगांव शहरात शोध घेतला असता अक्षय अजय जयस्वाल वय २४ वर्ष रा. शिवाजी नगर जळगांव आंबेडकर मार्केट परीसरात त्याचे मोटारसायकल क्र. MH १९ BK ८८९३ वर संशयीत रित्या बसलेला मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास अग्नीशस्वाबाबत विचारपुस केली असता त्याने अग्नीशरत्र हे त्याचे मोटारसायकलचे शिट खाली लपवुन ठेवल्याचे सांगितल्याने त्याचे मोटारसायकलची झडती घेतली असता त्याचे मोटार सायकलचे शिट खाली एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल (अग्नीशस्त्र) मॅग्झीनसह व ०५ जिवंत काडतूस किं. अं. ४००००/- मिळुन आल्याने त्याचे कडुन जप्त करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी सो., पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव तसेच मा.श्री. संदीप गावीत उपविभागीय पोलीस अधिकारी जळगांव भाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेको/ अकरम शेख, पोतेकों/मुरलीधर धनगर, पोहेको/प्रविण भालेराव, पोहेको/नितीन बाविस्कर, पोना/किशोर सोनवणे, पोकों/सिध्देश्वर डापकर, पोकों/रविंद्र कापडणे, पोर्को गोपाल पाटील यांच्या पथकाने केली आहे.