दि.१३/०१/२०२५ रोजी सायंकाळी ०६.३० वा.चे पूर्वी जळगांव शहरातील खेडी शिवार शिवनगर परिसरातील शंभु रेसिडेंसी येथील रविंद्र मगरे यांच्या फ्लॅट क्रमांक ०४ मधुन सोने चांदिचे दागिणे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन चोरुन नेले होते. बाबत फिर्यादीच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे CCTNS गुरन ३२/२०२५ भारतिय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्ह्याच्या तपासकामी मा. बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोउनि राहुल तायडे, सफौ विजयसिंग पाटील, पोहेको रामकृष्ण पाटील, पोकों/निलेश पाटील, पोकों/विशाल कोळी, पोको/राहुल रगडे अशांचे पथक नेमण्यात आले होते,
