जनतेचा निर्भीड आवाज म्हणजेच सौ. दीपाली अरुण कचरे
Ankush tv18 news network- या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सतत दुर्लक्ष करत असल्याच्या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्त्या व RTI Human Rights Activist Association च्या पदाधिकारी सौ. दीपाली अरुण कचरे यांनी पुढाकार घेत “अपघात टाळा – हक्क मागा” या जनजागृती मोहिमेस सुरुवात केली आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सतत दुर्लक्ष करत असल्याच्या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्त्या व RTI Human Rights Activist Association च्या पदाधिकारी सौ. दीपाली अरुण कचरे यांनी पुढाकार घेत “अपघात टाळा – हक्क मागा” या जनजागृती मोहिमेस सुरुवात केली आहे.
स्वतः पाहणी करून दिली निवेदन कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त ,मा. अभिनव गोयल साहेब यांना निवेदन देण्यात आले
दि. 1 ऑगस्ट २०२५ रोजी रात्री 1 वाजता, कल्याण पूर्व, पुणे लिंकरोड चिंचपाडा रोड पासून , ते साई इंग्लिश स्कूल पर्यंत. रस्त्यावर पडलेले खड्डे .सौ दिपाली कचरे यांनी स्वतः नंबर टाकून फोटो काढले तसेच ह्या कामाचे पाहणी केली खड्डे, वाहतूक कोंडी, शाळा, कॉलेज , वाहने ,अरुंद रस्ता वाहतूक कोंडी सतत होत असते रहदारी वस्ती असून अंधारलेले रस्ते,ड्रेनेज लाईन ओवर फ्लो होऊन खड्ड्यात साचलेले सांडपाणी यांची प्रत्यक्ष छायाचित्रे व माहिती त्यांनी नोंदवून, संबंधित अधिकार्यांना याची गंभीर दखल घेण्याचे निवेदन दिले

विठ्ठलवाडी आनंद दिघे ब्रिज ते बाईच्या पुतळा या दोन्ही ब्रिजवर पुन्हा रस्त्याच्या खड्ड्यावर रंगोटी काढायला निघालो. वालधुनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इथल्या पुष्पा डोळस ह्या ताई नेहमी प्रत्येक कार्यक्रमास सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्या तसेच इथले रहिवाशी , प्रवासी गाड्या थांबून एकत्र येऊन हे खड्डे निरीक्षणास दाखवून दिले खूप छान प्रतिसाद दिला सहकार्य केले .
काल रात्री खड्ड्यांची मलमपट्टी चालू करण्यात आली होती. इथे उपस्थित असलेले अधिकारी , ठेकेदार कामगार उपअभियंता सुनील वैद्य काम बघा .
गणपती बाप्पाच्या आगमना ते विसर्जनापर्यंत मलमपट्टी . फोटो दिसेल किंवा प्रत्यक्षात जाऊन बघा दोन्ही ब्रिजचे कॉन्ट्रॅक्टर वेगवेगळे आणि आंबेडकर नगर सर्कल चे काम KDMC अंडर असून एमएमआरडीएच्या हातात . काय हा प्रकार …?

मुख्य समस्या – जनतेचा उद्रेक
ठिकठिकाणी मोठे व खोल खड्डे – वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी जीवघेणे
सांडपाण्याने भरलेली गटारे आणि उघडी नाल्या – आरोग्याला धोका
बंद स्ट्रीट लाइट्स – अंधारात अपघातांचा धोका वाढतोय
फूटपाथवर अतिक्रमण – ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांना अडथळा
ट्राफिक सिग्नल बंद – वाहतूक नियंत्रण नाही
रस्त्यांवर साचलेला कचरा व दुर्गंधी – स्वच्छ भारताच्या स्वप्नाला काळिमा
खोदलेले रस्ते तसेच放 ठेवले – कोण घेणार जबाबदारी?
दररोज अपघात व वाहतूक कोंडी – शासकीय दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
सौ. दीपाली कचरे यांचे प्रशासनाला आणि जनतेला खुले आवाहन: “खड्ड्यांमध्ये आता पडायचं नाही, झोपायचं देखील नाही! प्रश्न प्रशासनाला विचारा, उत्तर मिळेपर्यंत पाठपुरावा करा.
जात-पात, धर्म-पक्ष बाजूला ठेवा, एकत्र या, हक्क मागा – न्याय मागा. फक्त सोशल मीडियावर चर्चा करून थांबू नका – प्रशासनास जबाबदार धरा!”
“अपघात टाळा – हक्क मागा” मोहिमेची उद्दिष्टे:
नागरिकांमध्ये रस्ते, वाहतूक व सार्वजनिक सुविधा याबाबत जागरूकता निर्माण करणे
संबंधित कार्यालयांना लेखी तक्रारी, RTI, निवेदने सादर करून त्यांच्याकडून उत्तर मागणे
स्थानिक पातळीवर जनआंदोलन उभारणे
सोशल मीडियाच्या माध्यमातून छायाचित्रे, व्हिडिओ, अनुभव मांडणे
अपघातग्रस्तांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे
प्रशासनाकडे ठाम मागणी:
सार्वजनिक गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही, प्रशासनाने आजवर कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. नागरिकांनी फक्त कर भरत राहायचा, दंड भरायचा, त्रास सहन करायचा – आणि सत्ताधारी, अधिकारी यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही?हा दुहेरी न्याय थांबला पाहिजे!
प्रशासनाने तातडीने पुढील उपाययोजना कराव्यात:
रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती
बंद ट्राफिक सिग्नल सुरू करणे
स्ट्रीट लाइट्स दुरुस्त करणे
अतिक्रमण हटवून फूटपाथ मोकळे करणे
सांडपाणी व कचऱ्याचे व्यवस्थापन
खोदकामाचे ठिकाण सुरक्षित करणे
अपघातांची जबाबदारी निश्चित करणे