Ankush tv18 news network
Bharti sarwne
Lohara pachora
जय हिंद उर्दू माध्यमिक विद्यालय, लोहारा (ता. पाचोरा, जि. जळगाव) या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक व कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक व अमानुष वर्तन केले जात आहे. यासंदर्भात संबंधित शिक्षक व कर्मचारी यांना न्याय मिळावा यासाठी दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून जळगाव जिल्हा परिषद कार्यालयासमोर पूलाखाली आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात येत आहे.
शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे
1. शाळेतील बेकायदेशीर व्यवस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.
2. शिक्षक व कर्मचाऱ्यांना तात्काळ न्याय मिळावा.
3. शिक्षण विभागाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोर्षीवर एफ.आय.आर. दाखल करावा.
4. चेअरमन, मुख्याध्यापक व त्यांच्या कुटुंबियांकडून चालविल्या जाणाऱ्या नातेवाईकवाद व बेकायदेशीर कारभारास आळा घालावा.
5. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत चाललेला शैक्षणिक नुकसान थांबवावे.
6. बदललेल्या शाळा रेकॉर्ड्स, जी. आर. क्रमांक व दस्तऐवजांवरील चौकशी करून जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
7. या सर्व मागण्यांकडे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन, दोषींवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. शिक्षक व कर्मचारी वर्गाला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. हा लढा पूर्णपणे लोकशाही मार्गाने व शांततेत राबविण्यात येणार असून, माध्यमांच्या माध्यमातून समाजापर्यंत सत्य पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– मानवी हक्क संघटना / पीडित पाच शिक्षक-कर्मचारी वर्ग
जावीद अहमद मोहम्मद नजीर उपशिक्षक – मो.9225761213 . मोहसिन अहमद शेख नईमुद्दीन – उपशिक्षक – मो.9579886575, अजय दिलीप रोकडे – उपशिक्षक , अकील कमरुद्दीन पिंजारी लिपिक मो. 8459595470 , निलेश प्रकाश पाटील- शिपाई मो. 8055646021