Ankush tv18 news network
Jalgaon-


मा. सर्वोच्च न्यायालय यांचेकडील फौजदारी अपील क्र. ६५२/२०१२ मधील निर्देश तसेच केंद्र सरकार यांनी दिलेल्या निर्देशानुसार एन.डी.पी.एस. कायदयान्वये दाखल गुन्हयातील जप्त मुद्देमाल नाश करण्याबाबत दिलेल्या कार्यपध्दतीनुसार तसेच मा. पोलीस महासंचालक, सो. महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या सूचनांनुसार जळगांव जिल्हा घटकात मा, पोलीस अधीक्षक, श्री डॉ. महेश्वर रेड्डी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून सदर समिती मध्ये मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री अशोक नाखाते, मा. पोलीस उपअधीक्षक, (गृह) श्री अरुण आव्हाड, तसचे सहाय्यक कृषी अधिकारी, श्री योगेश इंगळे, कृषी विभाग, हे सदस्य आहेत.
आज दि. ३०/०९/२०२५ रोजी जळगांव जिल्हा घटकातील पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. कायदयान्वये सकाळ व दुपार सत्र असे दोन टप्यात दाखल असलेल्या १९ गुन्हयांमधील जप्त असलेला एकुण १७०६ किलोग्रॅम गांजा हा जिल्हापेठ पोलीस स्टेशन इमारत मागील मोकळ्या जागेत जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती समोर कागद पत्राची पडताळणी करुन खड्डा खोदुन नाश करण्यात असुन संपुर्ण नाश प्रक्रीयेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष मा. पोलीस अधीक्षक सो., जळगांव, डॉ महेश्वर रेड्डी, व सदस्य मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक, (गृह) श्री अरुण आव्हाड, तसेच सहाय्यक कृषी अधिकारी, निरीक्षक वजनमापे राजेंद्र व्यवहारे यांचे उपस्थितीत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव, यांचे मार्गदर्शनाखाली सफी, संजय दोरकर, पोह. सुनिल दामोदरे, पोह जयंत चौधरी, पोह. संदीप पाटील, पोह. राहुल वैसाने, मपोह.निता राजपुत, पो. अं. रविंद्र चौधरी, सर्व स्थागुशा, जळगांव यांनी केली आहे.