Ankush tv18 news network

Jalgaon-Nashirabad – सदर मिसींग मुलगा नामे जय संजयकुमार जावरे वय १८ वर्ष तिन महीने, रा. राजेश्वर नगर, रिंग रोड, भुसावळ हा दि. १७/०७/२०२५ रोजी नशिराबाद येथुन कोणास काहीएक न सांगता निघुन गेला होता. त्यावरुन वर प्रमाणे मिसींग रजीष्टरी दाखल आहे. सदर मिसींग व्यक्ती याने निघुन गेल्या नंतर त्याने त्याचा मोबाईल नंबर बंद करुन दिला होता त्याचे कुठल्याही प्रकारे लोकेशन मिळत नव्हते. परंतु मा. पोलीस अधीक्षक साो. रेड्डी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साो.श्री नखाते साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी साो. संदीप गावीत यांचे मार्गदर्शन घेवुन सहा. पोलीस निरी.सो. ए. सी. मनोरे, यांनी सदर मिसींग तपासाकमी सहा. फौज. १४९० राजेश मेंढे, पो.हे.कॉ. २७१४ कमलाकर बागुल व मिसींग चे चौकशी अंमलदार पो.हे.कॉ. २०९६ प्रशांत विरणारे व पोकॉ, २५३० प्रकाश कोळी, यांचे तपासपथक नेमले होते सदर तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी कुठलाही धागादोरा नसतांना, सदर मिसींग मुलाचे बँक व्यवहार तपासले असता त्यावरुन व्यवहार झाल्याचे समजल्याने, सदर तपास पथकाने सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. शिवनारायण देशमुख, पो.हे.कॉ. दिलीप चिंचोले, पो.ना. सचीन सोनवणे, पो.कॉ. दिपक सोनवणे यांचे मदतीने तांत्रीक माहीती घेवुन सदर व्यवहाराचे विश्लेषन केले त्यावरुन मिसींग मुलगा हा ओरीसा राज्यात जगन्नाथ पुरी येथे असल्याचे समजुन आल्याने, वरील पोलीस तपास पथकाती अंमलदार यांनी जगन्नाथ पुरी येथे जावुन दोन दिवस थांबुन अथक परीश्रम घेवुन एवढ्या मोठ्या शहरात सदर मुलाचा शोध घेवुन त्यास दि. २०/०९/२०२५ रोजी सुमारे दोन महीन्या नंतर सुखरुप परत आणुन त्याचे पालकांचे स्वाधीन करुन कौतुकास्पद काम केले आहे. त्याबाबत मा. पोलीस अधीक्षक साो. श्री. रेड्डी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साो.श्री नखाते साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी साो. संदीप गावीतयांनी नशिराबाद पोलीस स्टेशनचे वरील नमुद पोलीस पथकातील अधीकारी व पोलीस अंमलदार यांचे कौतुक केले आहे.