Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » सेवाग्राम हद्दीत रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रॉली व रेतीसह एकुण 8,09,000/-रु चा मुद्देमाल जप्त

सेवाग्राम हद्दीत रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रॉली व रेतीसह एकुण 8,09,000/-रु चा मुद्देमाल जप्त

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

ANKUSH TV18NEWS

Vardha  – येथील पथक पोलीस स्टेशन सेवाग्राम परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, धाम नदी पात्राचे सावंगी (देर्डा) शिवार येथील रेतीघाटातुन ट्रॅक्टर ट्राँलीद्वारे रेती चोरी करून मदनीकडे घेऊन येत आहे. अशी माहिती मिळाल्याने पेट्रोलिंग दरम्यान मांडगाव कडून मदनीकडे येणाऱ्या रोडवर नाकेबंदी केली असता, नाकेबंदी दरम्यान मांडगाव कडून मदनीकडे येणाऱ्या रोडने रेतीने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक MH 32 AS 3922 हे विना क्रमांकाच्या ट्रॉली सह चोरीची काळी रेती भरून चोरटी वाहतूक करीत असतांना नाकेबंदी दरम्यान मिळून आल्याने आरोपी नामे 1) ट्रॅक्टर चालक – पप्पू दत्तूजी गुरनुले, वय 27 वर्ष, रा.वार्ड नंबर 1 धानोरा पोस्ट भानखेडा ता. जि. वर्धा, 2)ट्रॅक्टर मालक – हितेश धर्मराज बुरांडे वय 26, रा. वार्ड नंबर 3 धानोरा पोस्ट भानखेडा , तह. जि. वर्धा त्यांचे ताब्यातुन ट्रॅक्टर मधून शासनाचा कोणताही पास परवाना ( रॉयल्टी ) नसतांना अवैधरित्या विना पास परवाना काळ्या रेतीची चोरटी वाहतूक करीत असतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास रेतीसह *एकुण 8,09,000/-* रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर नमुद आरोपीचे विरुद्ध पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

दरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा यांचे निर्देशाप्रमाणे स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. महादेव सानप, पवन पन्नासे, विनोद कापसे, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा