Ankush tv18 news network
वर्धा :
आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावरील धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनधारकांची रोजची जीवघेणी कसरत सुरू होती. अनेक अपघातांचे निमित्त ठरलेले हे खड्डे , ए.आय.एम.आय.एम चे शहराध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी आसिफ खान यांनी खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार प्रशासनासमोर केली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने नेहमीप्रमाणे ढिम्मपणा दाखवित दुर्लक्षच केले.
नाईलाजाने आसिफ खान यांनी गुरुवारपासून सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हलले आणि घाईगडबडीत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. अखेर पुलावरील खड्डे बुजविण्यात आल्याने आसिफ खान यांनी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.
आसिफ खान यांनी सांगितले की, “नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने वेळेवर लक्ष दिले असते, तर आंदोलनाची गरजच पडली नसती. आज खड्डे बुजविण्यात आले, म्हणून उपोषणाला स्थगिती दिली आहे;
या सोबतच भारतीय जनता पार्टीचे काही माजी नगरसेवक हे खड्ड्यांचे राजकारण करू पाहत आहे. खड्डे बुजविण्यात आल्याचे खोटे श्रेय लाटण्यासाठी लुडबुड करत असल्याचे निदर्शनास येत आहे, जनतेला माहिती आहे हे काम आसिफ खान यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्याने पुर्ण झालेले आहे. जनता खोट्या अप प्रचाराला या वेळी बळी पडणार नाही.
या पुढे ही जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी लढा सुरू राहील असे प्रसार माध्यमांच्या वतीने आसिफ खान यांनी स्पष्ट केले.