Ankush tv18 news network
वर्धा प्रतिनिधी.
अब्दुल कदीर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यलय, कामगार भवन पुलगाव येथे पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय शरद भाऊ शहारे यांच्या मार्गदर्शनात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुलगाव देवळी विधानसभा अध्यक्ष तुषारभाऊ वाघ यांच्या नेतृत्वात पुलगाव येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. तसेच शहरातील जनतेचे प्रश्न, नागरिकांच्या समस्या, घरकुल, गावातील रोजगार,महिल कामगारचे प्रश्न, गिरणी कामगारचे प्रश्न अश्या अनेक समास्याचे निराकरण करण्यात आले. तसेच शहरातील प्रभागाचा आढावा घेण्यात आला. पावसाचे वातावरण असल्यामुळे गर्दी कमी होती परंतु या जनता दरबारला अनेक कार्यकर्ते नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवळी तालुका अध्यक्ष राजेश बढे, तालुका उपाध्यक्ष दिलीप काका मेश्राम, विधानसभा सरचिटणीस गोपाल पाटील, शहर कार्यकारी अध्यक्ष मनोजभाऊ खैरकर, निशाताई लोखंडे,सुवर्णा ताई मोहडे, विपुल भाऊ पाटील, स्नेहल भाऊ येसणकर तसेच अनेक पदाधिकारी, राष्ट्रवादी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
तसेच दिलीप काका मेश्राम यांची उपाध्यक्ष पदावरून देवळी पुलगाव विधानसभा संघटक या पदी नियुक्ती करण्यात आली. आणि बऱ्याच लोकांचा पक्ष प्रवेश व काही झनांना पद देण्यात आले. समस्त पुलगावच्या जनतेनी तुषारभाऊ वाघ यांना पाठिंबा देत समर्थनाची हमी दिली. व तुषारभाऊ चे कामाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.