Ankush tv18 news network
पाचोरा शहरात इसम नामे सोहेल शेख तय्युच शेख, वय. २४ वर्षे, रा. स्मशान भुमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा, जि. जळगांव यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली असुन विक्री करण्यासाठी आणलेलया एकुण १८ तलवारी किंमत अंदाजे ५४,०००/-रुपये हया लपवून ठेवलेल्या ड्रिकाणावरुन काढुण दिलेलया आहेत. तसेच काही तलवारी त्याने विक्री केल्या आहेत असे सांगीतले आहेत. तरी त्याचेविरुध्द पाचोरा पोलीस ठाणे गु. रजि. क्रमांक ४६०/२०२५, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) (३), १३५ प्रमाणे दिनांक १९/०९/२०२५ रोजी अन्वये दाखल करण्यात आला आहे. व पुढील तपास पाचोरा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक सोो, श्री. महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक सोो, चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी सोो, श्री. अरुण आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, पोउपनिरी/कृष्णा घायाळ, पोउपनिरी/कैलास ठाकुर, पोकॉ/९९० संदिप राजपुत, पोकॉ/१६०९ जितेंद्र पाटील, पोकों/हरीष परदेशी यांनी पार पाडली आहे.