Ankush tv18 news network
Jalgaon
एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली मेहरुण परीसरातील जे. के. पार्क स्विमींग पुलाच्या जवळ सापळा लावुन, एक इसमास ताब्यात घेतले त्याच्याकडुन ०२ वेगवेगळया पारदर्शक प्लास्टीकच्या पुडयामध्ये पांढऱ्या व पिवळ्या रंगाचा स्फटीक मेथ एम्फेटामाईन सदृश ०६ ग्रॅम अंमली पदार्थ मिळुन आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत ६०,०००/- रुपये आहे. नमुद आरोपीताकडुन ०२ वेगवेगळ्या कंपनीचे २२,०००/- रुपये किंमतीचे मोबाईल फोन देखील हस्तगत करण्यात आले आहेत. त्यास अटक करण्यात आले असुन, त्याचे नाव मेहमुद हनीफ पटेल वय ३५ वर्ष रा.एच.पी.पेट्रोल पंप, ममता हॉस्पीटलजवळ, मास्टर कॉलनी जळगाव असे असून, त्याने सदरचा अंमली पदार्थ इसम नामे अरमान चिंधा पटेल रा. शेरा चौक मेहरुण जळगाव याच्याकडुन विक्रीसाठी आणल्याचे सांगीतले म्हणुन दोन्ही आरोपीतविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन जळगाव येथे गु.र.क्रं.६७२/२०२५ एन.डी.पी.एस.१९८५ चे कलम ८ (क), २१ (ब), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन, पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोशि योगेश घुगे करीत आहेत.
नुकताच दोन आठवडयापुर्वी सुरत शहरात १९८ ग्रॅम एम्फेटामाईन सदृश अंमली पदार्थ सुरत पोलीसाकडुन पकडण्यात आला होता. त्यात जळगाव शहरातील इसम नामे नाझीम रशीद कुरेशी रा. मास्टर कॉलनी जळगाव हा फरार होता.
त्याचा शोध घेणेकामी सुरत पोलीस जळगाव जिल्हयात येऊन गेले होते. परंतु त्यांना नाजीम कुरेशी मिळुन आला नव्हता. त्यास देखील स्थानीक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने दिनाक २०/०९/२०२५ रोजी ताब्यात घेऊन सुरत सिटी पोलीस स्टेशन (क्राईम ब्रैच सुरत सिटी) यांच्या ताब्यात दिले आहे. त्याबद्दल सुरत सिटी क्राइम बैंच च्या वतीने स्थानिक गुन्हे शाखा जळगाव च्या पथकाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
सदर सदरची कारवाई मा.श्री.डॉ. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधिक्षक जळगाव, मा. श्री अशोक नखाते सो अपर पोलीस अधिक्षक जळगाव, मा.श्री. नितीन गणापुरे सो, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, श्री बबन आव्हाड पोलीस निरीक्षक सपोनि गणेश वाघ नेम.एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन जळगाव पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ/अतुल वंजारी, पोहवा/अकरम शेख, विजय पाटील, प्रविण भालेराव, सलीम तडवी, पोना/ किशोर पाटील, पोशि/गोपाल पाटील, रविंद्र कापडणे, सिध्देश्वर डापकर, रविंद्र चौधरी चापोशि महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली आहे.