Ankush tv18 news network
Vardha -आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावरील गड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल: गड्डे तात्काळ बुजवावेत अन्यथा सोमवारपासून उपोषण : आसिफ खान
वर्धा शहरातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावरील गड्ड्यांमुळे दररोज हजारो वाहनधारक व प्रवाशांचे हाल होत आहेत. अपघाताचा धोका वाढला असून शासकीय यंत्रणा व प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
ए.आय.एम.आय.एम चे नेते आसिफ खान यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
“जर प्रशासनाने सोमवारपूर्वी उड्डाणपुलावरील गड्डे बुजवले नाहीत तर मी सोमवारपासून उपोषणाला बसणार. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे.”
नवरात्र उत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला असताना वर्धा शहराच्या नवरात्र उत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात शहरात देवीच्या दर्शना साठी गाव खेड्यातून नागरिक येतात त्या मुळे या पुलावर वाहतूक फार मोठ्या प्रमाणावर होते.
नवरात्राच्या पहिले ह्या पुलावरचे खड्डे बुजविण्यात आले पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांकडून देखील प्रशासनावर दबाव टाकण्यात येत असून अनेकांनी आसिफ खान यांच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे.