Ankush tv18 news network
यावल दि.२० ( सुरेश पाटील )
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यावल येथील पद्मावती हॉलमध्ये दि.१४ सप्टेंबरला मोफत मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले. शिबिरात ११० जणांचे तपासणी करून ३२ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यात आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ ठीक ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आले.
यावल शहरामध्ये चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोति बिन्दु शिबिराचे आयोजन शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख समाधान जी महाजन यांनी केले. येथील बोरावल जेट जवळील पद्मावती हॉल येथे केले यात मोती बिंदू शिबीर तपासणी व मोफत मोति बिंदू शस्त्रक्रिया शिबीर दि.१९ सप्टेंबर ला करण्यात आले. शिबिराचे आयोजक डॉ.विवेक वासुदेव अडकमोल शहर संघटक शिवसेना शिंदे गट यांनी आयोजित केले होते.कॅम्पचे अध्यक्ष पदी. यावल येथील डॉ तुषार.टी.फेगडे होते.मोफत मोतीबिंदू शिबिरात मोठ्या संख्येने यावल शहरातील लोक सहभागी झाले एकूण ११० लोकांची तपासणी करण्यात आली ३२ लोकांना मोती बिंदू शस्त्रक्रिये करिता जळगाव येथे कांताई नेतालय हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिये करिता पाठवण्यात आले.प्रमुख उपस्तिती तुषार भाऊ बोरसे, नितीन सोनार,पंकज बारी,शहर प्रमुख उमेश फेगडे मा.नगर सेवक, विजय गजरे,इतर मान्यवर मुकेश् कोळी,चेतन सपकाळे, कोमल इंगळे,अजय केदारे,दिलीप भालेराव,अविनाश तायडे,हेमंत चौधरी सदाशिव भिल इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते