Ankush tv18 news network
Mumbai-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘आपले सरकार’ पोर्टलवरील आरटीएस अधिसूचित सेवांच्या स्थितीबाबत आढावा बैठक संपन्न झाली.
राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत नागरिकांना 1001 शासकीय सेवा पुरवण्याचे काम सुरू असून, ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून 997 सेवा आधीच उपलब्ध आहेत. आता या सर्व सेवांचा लाभ नागरिकांना अधिक सोप्या पद्धतीने मिळावा यासाठी त्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही पुरवण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
सेवा योग्य पद्धतीने आणि वेळेवर पोहोचण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात रिंग व क्लस्टर प्रणाली राबवण्यात यावी. सुरुवातीला एका तालुक्यातील 10 ते 12 गावांचा समावेश करून गरजेनुसार सेवा पुरवल्या जातील. यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन गट आणि सेवा सुलभीकरणासाठी ‘डिश डिजिटल सेवा हब’चा वापर करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या 9 सेवा एकत्र करण्याचे निर्देश दिले. तसेच सेवा गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत नियमित पडताळणी, अर्ज प्रक्रियेत लागणारी कागदपत्रे कमी करणे आणि सर्व जिल्हा परिषद, महापालिका व विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान करण्याचे निर्देश दिले.