Anksh tv18 news network
जळगाव, दिनांक १९ सप्टेंबर महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सेवा पंधरवाड्याच्या अनुषंगाने पेंशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन, जळगाव येथे होणार आहे.या मेळाव्यादरम्यान निवृत्तीवेतनधारकांच्या विविध समस्या व मागण्यांवर चर्चा होणार असून त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार स्वतः उपस्थित राहणार आहेत. सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या मेळाव्यामध्ये सहभागी होऊन निवृत्ती वेतनासंबंधीच्या शंका, समस्या व मागण्या मांडून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.