Ankush tv18 news network
Jalgaon-Yawal
यावल दि.१८ ( सुरेश पाटील )
शेतकऱ्यांचा “सातबारा कोरा” सरसकट कर्जमाफीसाठी यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी काळी पट्टी बांधून यावल तहसील कार्यालयासमोर आज मौन आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
यावल तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कर्जदार शेतकरी व दिव्यांग शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी व दिव्यांगांच्या विविध मागणीसाठी शासना समोर वारंवार आंदोलने करून सुद्धा सरकार दखल घेत नाही. संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने केली व आता सर्व जिल्ह्यात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग,मेंढपाळ,मच्छीमार यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रभर यात्रा सुरू आहे महाराष्ट्रात साडेसहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अजून किती आया बहिणींचे कुंकू पुसण्याची वाट पाहत आहे सरकार. अजून सरकारला जाग येत नाही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व दिव्यांग यांच्या विविध मागण्या लवकरात लवकर मान्य करावे यासाठी दिव्यांग बांधवांनी आज यावल तहसील कार्यालयासमोर काळी पट्टी बांधून आंदोलन केले व आपल्या मागणीची निवेदन दिले. आंदोलनात प्रहार दिव्यांग क्रांति संघटना यावल तालुका अध्यक्ष हरीभाऊ विजय पाटील,प्रहार महिला आघाडी यावल शहर अध्यक्ष मिना जनार्दन देशमुख,
चंन्द्रकांत पाटील दहिगांव, कडू जयकर,कडू जयकर,जगदीश पाटील,पंकज पाटील,आनंद कोळी,लश्मण धनगर, जावेद पटेल यावल,हकीम खान हसन खान यावल,धनगर बाबा नायगांव, रामदास पाटील डोंगर कठोरा, खेमचंद बेंडाळे,भास्कर जावळे, नरेंद्र पाटील,विकी गाजरे न्हावी बोआ डोंगर कठोरा,आशा देशमुख यावल,ॠषी चौधरी, रंगू चौधरी, सचिन देशमुख,मंगला कोळी, सुचित्रा कुरकुरे,निलीमा कोळी यावल इत्यादी दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.