Ankush tv18 news network
हमीद तडवी
भारत सरकारच्या अध्यक्षतेखाली देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पखवाडा’ अभियान राबवले जात आहे. तरी महाविद्यालयात त्याचा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत उपक्रमाचा प्रारंभ परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला.
“एक पेड मा के नाम” या अभियानांतर्गत तहसीलदार मा. बी. ए. कापसे, सिनेट सदस्य पद्माकर पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष दादासो हेमंत शेठ नाईक, सचिव मा. मुरलीधर कानडे तसेच संचालक मंडळातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत अभियानांतर्गत “स्वच्छता ही सेवा” उपक्रम राबविण्यात आला. या वेळी महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम घेऊन प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दोन्ही उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागातूनच अभियानाला मोठे यश मिळाले. सेवा पखवाडा अंतर्गत महाविद्यालयात येत्या दिवसांत विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.