Ankush tv18 news netwrok
Jalgaon- Bharti sarvne
जळगावमध्ये मुख्य पाईपलाईन फुटली
इंडिया गॅरेजजवळ तीन महिन्यांपासून सुरू गळती; तक्रारींकडे महापालिकेचा कानाडोळा
जळगाव : शहरातील इंडिया गॅरेज जवळ, यस बँकेसमोर गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेच्या मुख्य पाईपलाईनमधून पाणीगळती सुरू असून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. अनेकदा नागरिकांनी तक्रार करूनही महापालिकेने या समस्येकडे पूर्णपणे कानाडोळा केला आहे.
नागरिकांचे हाल
गळतीमुळे परिसरात पाणी साचून चिखल, दुर्गंधी व डासांची वाढ झाली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे. रस्त्यावर सतत ओलसरपणा असल्याने दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
महापालिकेवर आरोप
परिसरातील रहिवासी व व्यावसायिकांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
“तीन महिने झाले तरी महापालिका डोळेझाक करतेय. तक्रार केली की फक्त आश्वासन मिळतं, प्रत्यक्षात काम काही होत नाही,”
असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.