Ankush tv18 news network
अकोट
अकोट तालुक्यातील निळकंठ वसू पाटील अंकुश टीव्ही रिपोर्टर, अकोट प्रतिनिधी हे गेल्या काही दिवसांपासून सामाजिक व शासकीय गैरप्रकारांविरोधात निर्भीडपणे बातम्या प्रसिद्ध करत आहेत.
सत्य घटनांची वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या पत्रकारांनी काही ठेकेदारांच्या गैरकृत्यांवर उघड पडदा टाकला आहे. यामुळे संबंधित ठेकेदार व त्यांच्या पाठीराख्या नेत्यांकडून पत्रकारांना धमकीचे फोन येत असल्याचे समोर आले आहे. हे फोन ‘चेंले-चपाटे’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या माध्यमातून येत असून, पत्रकारांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मात्र, यासंदर्भात पत्रकारांनी ठाम भूमिका घेतली आहे – “आम्ही कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नाही. सत्य सांगणे हे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडत राहू.” असे प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
ते पुढे म्हणाले की, “सत्याची लढाई लढताना अडथळे येणारच. पण आम्ही न थांबता लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका पार पाडत राहू.” यावरून स्पष्ट होते की, अकोट तालुक्यातील काही प्रामाणिक पत्रकार लोकशाही व जनहितासाठी अपार धैर्याने लढत आहेत. त्यांच्या या लढ्याला समाजातील प्रत्येक सुजाण नागरिकाने पाठिंबा द्यावा, हीच अपेक्षा.