Ankush tv18 News network

JALGAON फिर्यादी काजल मुन्ना ठाकुर वय 29 वर्ष रा. भाखा अमरपुर थाना जि. दिंडोरी (म.प्र) यांची 05 वर्षाची मुलीचे कोणीतरी अज्ञात आरोपीताने अपहरण केल्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला सि सि टि एन एस गुन्हा रजी नं 491/2025 भा न्या सं कलम 137 (2) दिनांक 23/01/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान वरिष्टांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत असतांना सदर गुन्ह्यातील पिडीत मुलगी हिचा शोध घेत असतांना तांत्रीक विष्लेशनाद्वारे व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली बातमीची खात्री केली असता सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी नामे गोरेलाल भगवानसींग कछवे उर्फ मिलाला रा. अजदरा हा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर आरोपी यास उजनी देवस्थान ता. बोदवड येथुन ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. व त्यानुसार त्याचे ताब्यातुन सदर पिडीत मुलगी ही देखील ताब्यात घेवुन फिर्यादी यांचे ताब्यात सुखरुप देण्यात आली आहे. तसेच सदर आरोपी म. याचेवर यापुर्वी देखील चैनपुर पो स्टे जि. खरगोन (म.प्र) या ठिकाणी I.P.C SECTION 363 दिनांक 03/05/2022 नुसार गुन्हा दाखल आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ श्री. संदिप गावीत मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग जळगाव श्री. नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्रि. राहुल गायकवाड, तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो निरी श्री. नितीन पाटील, पो उप निरी श्रि. मंगेश जाधव, पो हे कॉ विजय नेरकर, पो हे कॉ कांतीलाल केदारे, पो हे कॉ रवींद्र भावसार, पो शि योगेश माळी, पो शि प्रशांत सोनार, पो शि भुषण चौधरी, पो शि अमर अढाळे, पो शि जावेद शहा, पो शि हर्षल महाजन, पो शि जिवन कापडे, पो शि योगेश महाजन, पो शि सचीन चौधरी, पो शि महेंद्रसींग पाटील, पो शि मोहसीन शेख, स्था गु शाखेचे पो उप निरी रविंद्र नरवाडे, पो हे कॉ उमाकांत पाटील, पो हे कॉ अक्रम शेख, पो हे कॉ गोपाल गव्हाळे, पो ना विकास सातदिवे, पो शि प्रशांत परदेशी, पो शि राहुल वानखेडे, पो शि राहुल रगडे, पो शि उदय कापडणे, पो शि रविंद्र चौधरी, पो शि किशोर पाटील, नेत्रम कॅमेरा विभागाचे पो शि मुबारक देशमुख, पो शि पंकज राठोड, पो शि प्रणय पवार अश्यांनी केली आहे. तसेच वरिष्टांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक श्री राहुल वाघ, पो हे कॉ रमण सुरळकर हे करीत आहेत.





