ankush tv18 news
८ वर्षापुर्वी अपहृत झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेतले बाबत.
जळगाव जिल्ह्यातील ४ महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी होऊन देखील अपहृत मुले व मुली यांचा शोध न लागल्यास त्यांचा शोध मा. पोलीस अधिक्षक सो. महेश्वर रेड्डी सर, मा. अप्पर पो. अधिक्षक श्री. नखाते सर, पोलीस उप अधिक्षक श्री. अरुण आव्हाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे सपोनि हरीदास बोचरे, पोउपनिरी/दिनेश बडगुजर, श्रेपोउपनिरी/ रवि पाटील व पोलीस अंमलदार हे करीत असतात.
दाखल गुन्हयांचा आढावा घेतला असता मिळुन न आलेल्या मुलां-मुलींपैकी बरेचसे गुन्हे आदिवासी समाजातील मुला-मुलींशी निगडीत असुन त्यांची कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले होते. तेव्हा दाखल गुन्हयातील पिडीत मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आपआपले गोपनीय बातमीदार यांना संपर्क करुन आदिवासी समाजाचे मेळावे, यात्रा, उत्सव व आठवडे बाजार या ठिकाणी शोध घेणे बाबत व उपयुक्त माहिती प्राप्त झाल्यास सपोनि हरीदास बोचरे, पोउपनिरी/दिनेश बडगुजर यांनी तात्काळ कळविणे बाबत सुचना दिल्या होत्या.
AHTU कडील तपास पथकातील पोहेकॉ/दिपक पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांनी बातमी दिली की, होळी निमीत्ता कर्जाणे, ता चोपडा येथे भोंगऱ्या बाजार भरलेला असुन बाजारात एक १५-१६ वर्ष वयाची मुलगी मिळुन आलेली असुन तिचे पालक तिचे सोबत नाही तसेच तिला तिचे नाव-पत्ता देखील सांगता येत नाही तेव्हा सपोनि / हरीदास बोचरे, पोउपनिरी/दिनेश बडगुजर यांनी सदर मुलीचा फोटो मागविला असता तपासावरील गुन्हयातील फोटो सदर मुलीशी जुळत नव्हता म्हणुन पोउपनिरी/बडगुजर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा मदतीने AHTU शाखेतील तपासावर प्रलंबित असलेल्या केसेस मधील सर्व अपहृत मुली या आज रोजी कश्या दिसत असाव्यात या बाबत त्यांचे फोटो बनवुन घेवुन त्यांचे अवलोकन केले असता त्यातील एका मुलीची चेहरेपट्टी ही AHTU कडेस तपासावर असलेला एम.आय.डी. सी. पो. स्टे भाग ५ गुरनं. ३५९/२०१८ भादवि कलम ३६३,३७० मधील अपहृत मुलगी वय ९ वर्ष हिचेशी जुळत असल्याचे दिसले. तेव्हा सपोनि/हरीदास बोचरे यांनी वरीष्ठांच्या परवानगीने AHTU शाखे कडील तपास पथक पोउपनिरी/बडगुजर, सफौ/विठ्ठल फुसे, पोहेकॉ/ दिपक पाटील, मपोहेकॉ/मनिषा पाटील, पोहेकॉ/किरण धनगर, सफौ/सलीम शेख असे कर्जाणे, ता चोपडा या ठिकाणी रवाना केले. तिचा गोपनिय रित्या व आधुनिक तंत्रज्ञानाचा मदतीने शोध घेवुन पुढील योग्य त्या कायदेशिर कार्यवाहीकामी सदर मुलीस एम.आय.डी.सी पोस्टे चे ताब्यात दिलेले आहे.
सदर गुन्हा मा. पोलीस अधिक्षक सो. महेश्वर रेड्डी सर, मा. अप्पर पो. अधिक्षक श्री. नखाते सर, पोलीस उप अधिक्षक श्री. अरुण आव्हाड सर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हरीदास बोचरे व AHTU कडील तपास पथक पोउपनिरी/बडगुजर, सफौ/विठ्ठल फुसे, पोहेकों/ दिपक पाटील, मपोहेकॉ मनिषा पाटील, पोहेकॉ किरण धनगर, सफौ/सलीम शेख यांनी सन २०१८ मध्ये अपहृत मुलगी वय ९ वर्ष हिचा सुमारे ८ वर्षा नंतर शोध घेवुन उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.




