Ankush tv18 news network
यावल दि.१८ (सुरेश पाटील ) तालुक्यातील परसाडे येथील हिंदू विरोधी समाजकंटकाने दोन धर्मात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने राजमाता माँ साहेब जिजाऊमाता यांच्या बद्दल अशिल वक्तव्य केल्याने कठोर कारवाई करावी अशा मागणीची तक्रार वजा निवेदन यावल येथील सकल हिंदू समाज,राष्ट्रीय बजरंग दल पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली.
यावल पोलिसांकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,सोशल मिडीयावर केलेली पोस्ट ही सामाजिक अशांतता पसरवणारी व हिंदु भावाना दुखवणारी व सकल हिंदु समाजाची आराध्य दैवत यांचा अपमान करणारी तसेच सामाजीक तेढ निर्माण करणारी आहे.ती तात्काळ संबंधित ॲपवरुन डिलीट करावी.
ही पोस्ट ज्या हिंदु विरोधी समाज संकटकाने टाकली आहे व या पोस्टला ज्या ज्या व्यक्तिंनी समर्थनार्थ कमेंट दिलेल्या असतील त्यांच्यावर सायबर सेल अंतर्गत गुन्हे दाखल करावे.
राजमाता माँ साहेब जिजाऊ माता व सकल हिंदु समाजाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अश्लिल वक्तव्य पोस्ट करून त्या हिंदु विरोधी समाजकंटकाने संपुर्ण हिंदु समाजाचा अपमान करुन गावात तसेच महाराष्ट्रात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या विरोधात कठोरातील
कठोर दंडात्मक कार्यवाही करावी.
साहिल तडवी रा.परसाडे ता.यावल या हिंदु विरोध समाजकंटकाने दोन धर्माण तेढ निर्माण करुन गावातील व महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचे कृत्य केलेले आहे व माँ साहेबराजमाता जिजाऊमाता व हिंदु समाजाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अश्लिल व्यक्तव्य करुन हिंदु समाजाच्या भावना दुखवुन माँ साहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाणून बुजून अपमान केलेला आहे.अशा हिंदु विरोधी पोस्ट टाकणाऱ्या प्रत्येक समाजकंटकाला चांगली अद्दल प्रशासनाने घडवावी व कोणी अशा प्रकारचे कृत्य करणार नाही अशा कठोरातील कठोर कलमांतर्गत दंडात्मक कार्यवाही करावी व त्याचे असलेले सोशय मिडीयावरुन संपुर्ण अकाउंट बंद करावे अशी विनंती सकल हिंदु समाज करीत आहे.
पोलीस निरीक्षक रवींद्र धारबडे यांना निवेदन देताना राजेश्वर संजय बारी ( राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा सहमंत्री जळगाव ) चेतन पाटील ( राष्ट्रीय बजरंग दल ) युवराज बारी ( राष्ट्रीय बजरंग दल ) अंकुश घारू
चेतन कपुरे,जयवंत माळी,स्वप्नील कोलते,दिगंबर बारी,खेमराज करांडे,पंकज पवार,मुकेश कोळी,
सचिन चौधरी,सौरभ भोईटे,गोपाल कोलते,विनीत देशमुख,पंकज चौधरी,अनिकेत सोनवणे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.