कासोदा शहरातील फरकांडे चौफुलीजवळ एक इसम हातात तलावर घेवुन संशयास्पद हालचाली करीत आहे, अशी गोपनिय माहीती मिळाल्याने संबंधीत इसमावर पाळत ठेवुन तलवारीसह ताब्यात घेण्यासाठी व सदर इसमावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार/नरेंद्र पाटील पोलीस अंमलदार/सोनु पाचुंदे यांना रवाना केले. सदर ठिकाणी पोलीस स्टाप पोहचल्यावर तेथे इसम नामे राघव रामा कुवर रा. कोळबल्ली चेंबर गलवाडा रस्ता, कासोदा हा त्याचे हातात तलवार बाळगुन दहशत पसरवुन सार्वजनिक शांतता भंग करीत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते. व त्याच्याकडुन धारदार पात्याची तिन फुट लांब लांबीची तलवार जप्त करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा.पोलीस अधिक्षक सो, श्री महेश्वर रेड्डी सर यांच्या आदेशानुसार व मा. अपर पोलीस अधिक्षक सो, श्रीमती कविता नेरकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, श्री विजयकुमार ठाकुरवाड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/निलेश राजपुत, पोउनि/धर्मराज पाटील, ग्रेड पोउनि रामकृष्ण पाटील, पोहेका/नितीन सुर्यवंशी, पोहेका राकेश खोंडे, पोहेका/श्रीकांत गायकवाड, पोका/निलेश गायकवाड, पोका/योगेश पाटील, पोका दिपक देसले यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.