ANKUSH TV18 NEWS NETWORK
हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणारे उल्लंघन करणारे ]तेजस दिलीप सोनवणे सागर ऊर्फ बीडी सुरेश सपकाळे ताब्यात
शस्त्र अधिनियम कलम 3, 25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल
JALGAON – शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील राहणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोपी नामे 1) तेजस दिलीप सोनवणे यांस मा. उपविभागीय दंडाधिकारी जळगांव यांच्याकडील तसेच 2) सागर ऊर्फ बीडी सुरेश सपकाळे, यास मा. पोलीस अधीक्षक सो यांनी प्रचलित कायद्यानुसार ठराविक कालावधीसाठी जिल्ह्यातुन हद्दपार केले होत.
दिनांक 20/08/2025 रोजी संध्याकाळी पेट्रोलींग दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत माहिती पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर यांना प्राप्त झाली की सदर आरोपी हे कोणतेही वैध कारण किंवा कायदेशीर परवानगी न घेता आपल्या राहत्या घरी वास्तव्य करीत आहे. मिळालेल्या बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह गणेशकुमार नायकर, दिपक गजरे, शशिकांत पाटील, गणेश ढाकणे, नवजीत चौधरी, काजोल सोनवणे तात्काळ रवाना होवुन छापा टाकला असता आरोपी आपलय घरात मिळुन आले, त्यास ताब्यात घेवुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दिनांक 07/08/2025 रोजी एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दपार आरोपी स्वप्नील ऊर्फ गोल्या धर्मराज ठाकुर हा देखील शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत डी.एन.सी कॉलेज परीसरात गावठी पिस्टल सह दहशत माजवित असतांना मिळुन आला होता. त्याच्यावर शस्त्र अधिनियम कलम 3, 25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.