ANKUSH TV18 NEWS NETWORK
स्थानिक गुन्हे शाखा जळगांव तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी यांनी सुयक्त रित्या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यास केली जेरबंद.
जळगांव जिल्हयात वाढऱ्या अमली पदार्थ तस्करी व वाढऱ्या अंमली पदार्थाचे सेवन या अनुषंगाने मा.डॉ.श्री. महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा.श्री. अशोक नखाते सो. अपर पोलीस अधीक्षक जळगाव परिमंडळ तसेच मा.श्री. संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधीकारी सो. भुसावळ उपविभाग, यांनी श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना त्या बाबत योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.
दि.२२/०८/२०२५ रोजी पहाटे ०१.५५ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. गोपाळ पोपट गव्हाळे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, एक इसम काळया रंगाच्या शाईन होन्डा मोटार सायकलवर भुसावळ शहरात अवैधरित्या गांजा सदृश अमली पदार्थाची बेकायदेशीरपणे वाहतुक करीत आहे. त्यावरुन सदर बाबत माहिती श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना सदरची बातमी कळविल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव कडिल पो.उप. निरी. शरद बागल, श्रे.पो.उप. निरी. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे, पो.हे.कॉ. संदिप चव्हाण, पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, पो.ना. विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी, पो. कॉ. राहुल वानखेडे यांचे पथक तयार करुन त्यांना वर नमुद प्रमाणे बातमी कळवून पुढील योग्य ती कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले. त्यानुसार सदर बातमीची खात्री करुन योग्य ती कारवाई करणेकामी भुसावळ कडेस रवाना झालोत. सदर बातमी बाबत श्री. राहुल वाघ, पोलीस निरीक्षक भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. यांना कळवून त्यांना देखील सदर छाप्याकामी सोबत येणे बाबत कळविले वरुन त्यांनी भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. कडिल श्री.नितीन पाटील, सहा.पो.निरी., पो.कॉ. हर्षल महाजन, पो. कॉ. परेश बिन्हाडे असे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल सुरुची इन समोरील नॅशनल हायवे रोडचे नागपुर कडे जाणाऱ्या वाहिनीवरील सव्र्व्हस रोडवर गोपनिय बातमीदारा मार्फत दिलेल्या बातमी प्रमाणे एक इसम होन्डा शाईन कंपनीची काळया रंगाची मोटार सायकल येतांना दिसल्यावरुन त्याने पेट्रोलिंग टाकीवर समोर गोणीत बातमीदाराने सांगितल्या प्रमाणे काहीतरी ठेवलेले दिसले. त्यास पोलीसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला परंतु त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास शिताफीने कारवाई पथकाने ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव, गांव विचारता त्याने त्याचे नांव अनारसिंग वालसिंग भिलाला, वय-३०, रा.शमलकोट ता. झिरण्या जि. खरगोन राज्य मध्यप्रदेश असे सांगितले. नमुद आरोपीताकडून ७५,०००/- रु.कि.ची काळया रंगाची सी.बी. शाईन मॉडेलची मोटार सायकल क्र. MP-०९-VM-४३९५ क्रमांकाची मोटार सायकल, तसेच २,०५,५००/- रुपये किमतीचा १०.२७५ किलो ग्रॅम वजनाचा गांजा तसेच १०,०००/- रु.कि.चा मोबाईल हॅन्डसेट असा एकूण २,९०,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवून पो.कॉ. विकास सातदिवे नेम.स्था.गु.शा. जळगांव यांच्या फिर्याद वरुन भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. सी.सी.टि.एन.एस.क्र.४०३/२०२५, N.D.P.S. अॅक्ट. १९८५ चे कलम २०(ब), २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. करीत आहे.
Aldes सदरची कारवाई मा.डॉ.श्री. महेश्वर रेड्डी सो 1., पोलीस अधीक्षक, जळगांव, मा.श्री. अशोक नखाते सो 1. अपर पोलीस अधीक्षक जळगाव परिमंडळ तसेच मा.श्री. संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधीकारी सो. भुसावळ उपविभाग, श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव, श्री. राहुल वाघ, पोलीस निरीक्षक, श्री. नितीन पाटील सहा. पो. निरी. भुसावळ बाजारपेठ पो.स्टे., पो.उप.निरी.शरद बागल, श्रे.पो.उप.निरी.रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे, संदिप चव्हाण, उमाकांत पाटील, पो.ना.विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, चा.पो.कॉ. महेश सोमवंशी सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव, पो. कॉ. हर्षल महाजन, पो.कॉ. परेश बिऱ्हाडे सर्व नेम. भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. यांच्या पथकाने केली आहे.