Ankush tv18 news network
Jalgaon – Raver Nimbhora गेल्या काही दिवसा पासुन निंभोरा पोलीस स्टेशन तसेच सावदा, यावल, रावेर, मुक्ताईनगर या परिसरातील शेतकरी यांचे शेती उपयोगाचे साहीत्य तसेच तोलकाटया वरील बॅटरी-इन्व्हेंटर साहीत्य व मोटार सायकल चोरीस जाण्याच्या घटना घडल्याने निंभोरा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री. हरीदास बोचरे यांना वरिष्ठांनी दिलेल्या सुचना प्रमाणे ताबे पोलीसांच्या मार्फत गेल्या १५ दिवसा पासुन साकळी पध्दतीने नाकाबंदी, रात्रगस्त करुन तांत्रीक व अधुनिक पध्दतीने तपास करुन व मिळालेल्या गुप्त माहिती वरुन दि. ११/०९/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास संशयीत इसम विलास ऊर्फ काल्या सुपडु वाघोदे रा. वडगांव नादी काठी याचा शोध घेतला असता तो पोलीस आल्याची चाहुल लागल्याने पळुन गेला त्याचे राहते घर झोपडी मध्ये त्याचे सोबत राहत असलेली महिला योगीता सुनिल कोळी हि मिळुन आली सदर झोपडी तपासली असता त्या मध्ये मो.सा. लहान सोलर प्लेट, नाळी इतर साहीत्य मिळुन आल्याने त्याबाबत कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता सदरचे साहित्य हे विलास ऊर्फ काल्या वाघोदे हा त्याचे शिरसाळा येथील साथीदार यांचे मदतीने चोरी करुन वडगाव येथील जमील तडवी, याचे मदतीने निंभोरा येथे राहणारा स्वप्नील चौधरी यास विकत असल्याची कबुली दिल्याने सपोनि हरीदास बोचरे यांनी निंभोरा पोलीसांच्या मदतीने चोरीचा माल घेणारा मुख्य सुत्रधार स्वप्नील वासुदेव चौधरी यास ताब्यात घेवुन त्यास अधिक विश्वासात घेवुन त्याचे घर व गोडावुन मधुन चोरी केलेल्या बॉटरी, इन्व्हेंटर मशिन व शेती साहीत्य तसेच इतर साहित्य वगैरे मिळून आले आहे.
सदर प्रकरणात चोरी करणारा मुख्य आरोपी १) विलास ऊर्फ काल्या सुपडु वाघोदे रा. वडगाव नदीकाठी (फरार), हा असुन त्याचे सहकारी २) सौ. योगीता सुनिल कोळी रा. तपत कठोरा ह.मु. वडगांव नदीकाठी, ३) गोपाळ संजय भोलनकर, ४) आकाश मधुकर घोटकर, ५) अर्जुन रतनसिंग सोळंकी सर्व रा. शिरसाळा ता. बोदवड, हे आहेत. सदर आरोपी यांनी चोरी केलेला माल ताब्यात ठेवून विल्हेवाट लावणारा आरोपी ६) जमील अब्दुल तडवी वय ४० रा. वडगांव तसेच सर्व चोरीचा माल घेणारा आरोपी ७) स्वप्नील वासुदेव चौधरी वय ३५ रा. निंभोरा बुा ता. रोवर हा असुन चोरीचा माल घेतलेले ८) राकेश सुभान तडवी वय ३२ रा. सावदा ता. रावेर, ९) ललीत सुनिल पाटील रा. निंभोरा बुद्या ता. रावेर, १०) राहुल ऊर्फ मयुर अनिल पाटील रा. वडगांव ता. रावेर हे सदर आरोपी यांचे कडुन शेती साहित्य H.T.P. पंप मटेरीयल सोडण्याचे मशिन ५, मोठ्या साईच्या बॉट-या ११, लहान साईच्या बॉट-या-०३, इन्व्हर्टर मशिन-७, मोटार सायकल-४, पावर ट्रोलर लहान ट्रॅक्टर-२ नॅनो कार-१, सोलर प्लेट लहान-२, मटेरीयल बेंग-११, ठिबक नड्या बंडल-०३, तसेच इतर शेती व इलेक्ट्रीक साहित्य असा एकुण १२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन निंभोरा पोलीस स्टेशन कडील ०५ गुन्हे, यावल पो.स्टे.चे ०२ गुन्हे, रावेर पो.स्टे.चे ०१ गुन्हे, मुक्ताईनगर पो.स्टे.चे ०१ गुन्हे, सावदा पो.स्टे. चा ०१ गुन्हा, असे एकुण १० गुन्हे उघडकीस आणुन निंभोरा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी आरोपी अटक करुन मुद्देमाल हस्तगत करुन धडाकेबाज कारवाई केली आहे.