ANKUSH TV18 NEWS NETWORK
SATARA -BREAKING NEWS
फलटण शहरातील डॉक्टर आत्महत्या दुर्लक्ष प्रकरणी -संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन ची श्री. देवेंद्र फडणवीस निवेदन -पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर तात्काळ निलंबित ची मागणी-

सातारा जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुली व महिलांवर वारंवार बलात्कार ,विनयभंग,निर्गुण हत्या व आत्महत्येच्या घटना वारंवार घडत आहेत या घटनेच्या निषेधार्थ सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी व सातारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांना निलंबित करण्यात यावे. सातारा जिल्ह्यातील परिस्थितीवर, गुन्हेगार, आरोपी व अल्पवयीन मुली व महिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच पोलीस प्रशासनातील विकृत मानसिकतेचे पोलीस यांच्यावर नियंत्रण नाही, दुर्लक्ष तर अति प्रमाणातच आहे.
त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना माझी कळकळीची मागणी आहे की या दोन्ही सातारा जिल्हा यांची साताऱ्या जिल्ह्यामधून तात्काळ बदली करावी व सक्षम व योग्य असे पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा जिल्ह्याला पाठवावे
कारण सातारा जिल्ह्याला जिल्ह्यातील नागरिकांवर आरोपींवर महिला व मुलींवर व खास करून त्यांच्याच पोलीस विभागातील पोलिसांवर निमंत्रण ठेवता येत नाही म्हणूनच नियंत्रण ठेवणारे पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस असावे
नुकतीच दहा दिवसापूर्वी सासपडे गावातील घटना घडली, तसेच दोन दिवसापूर्वी फलटण शहरातील एका डॉक्टर महिलेने पोलीसांच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे तेव्हा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निष्काळजीपणे वागतात तेव्हा असल्या घटना घडतात त्यामुळे या दोघांना तात्काळ निलंबित तरी करावे किंवा त्यांची सातारा जिल्ह्यातून बदली तरी करावे.-सौ.प्रतिभा सुनील शेलार
संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन





