Ankush tv18 news network
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा, रिपब्लिकन सेना युवक आघाडीच्या वतीने जुडो मारो आंदोलन व जाहीर निषेध,

रिपब्लिकन सेना युवक आघाडीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या व ग्वालीयर येथील वकील अनिल मिश्रा नावाच्या इसमाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत सोशल मीडियावर व प्रसिद्धी माध्यमावर अपशब्द वापरून जातीय द्वेष भावनेतून अवमान केला आहे. या घटने मुळे तमाम आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या असून या घटनेच्या निषेधार्थ आज बालगंधर्व चौक पुणे येथे जोडो मारो आंदोलन करण्यात आले, त्यावेळी रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र अध्यक्ष युवराजजी बनसोडे यांनी राज्य सरकार वरती न्यायव्यवस्था आपली गुलाम झाल्यासारखी वागती अशा नराधमावरती कुठलीच कारवाई होत नाही जोरदार हल्लाबोल केला त्यावेळी रिपब्लिकन सेनेचे शहर अध्यक्ष हनुमंतअण्णा पपूल यांनी तमाम भारतीयांना आवाहन केले हा हल्ला संविधानावर आहे आपल्या लोकशाही वर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आहे याचा निषेध जगभर झाला पाहिजेल अन्यथा आपल्याला हुकूमशाहीला बळी पडाव लागेल तसेच रिपब्लिकन सेना युवक आघाडीचे शहर अध्यक्ष अजय भालशंकर यांनी सांगितले काही मनोवादी विचारसरणीचे लोक महापुरुषांवरती बेताल वक्तव्य करून देशात दंगा भडकवण्याचे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे व समाजा समाजामध्ये जातीमध्ये तेड निर्माण करण्याची काम करत असून अशा मनुवादी विचाराच्या सडलेल्या बुद्धीच्या लोकांवरती तात्काळ ॲट्रॉसिटी अंतर्गत इतर कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन सेना युवक आघाडीच्या वतीने राज्यभर जण आंदोलन करू असा इशारा देण्यात आला, यावेळी रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास बनसोडे, रिपब्लिकन सेना युवक आघाडीचे सरचिटणीस दत्ता नाना शेंडगे, महासचिव सतीश साबळे, उपाध्यक्ष बाबुभाई पठाण, बाबा पाटोळे, समाधान कारंडे, सचिन खलसे, बाळासाहेब हजारे,अल्ताब कोरबू, संतोष साखरे, अजय साळवे, रोशन लोखंडे, बाळासाहेब हजारे, राजवर्धन कांबळे, विलास वाघमारे, सोमनाथ लोंढे, इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते,





