Ankush tv18 News network

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्याला केवळ शिवीगाळ करणे हा शासकीय कामकाजात अडथळ होऊ शकत नाही. तो गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई सत्र न्यायालयाने दिला. याप्रकरणी धर्मेंद्र सिंग आणि संजय दुबे या संशयितांना दोषमुक्त करण्यात आले आहे.
सांताक्रूझ रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवर रांगेत उभ्या राहिलेल्या प्रवाशांना त्रास दिल्याप्रकरणी धर्मेंद्र आणि संजय यांना आरपीएफ जवान नंदलाल शर्म व त्यांचे सहकार जुबेर शेख यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. यावर त्यांनी जवानांना शिवीगाळ केली. याप्रकरणी ७ जून २०१४ रोजी याप्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दाखल केलेल्या गुन्ह्यातून दोन्ही संशयितांची सात वर्षांनंतर सबळपुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. मेहता यांनी हा निकाल दिला.