ANKUSH TV18 NEWS NETWORK
(जळगाव हमीद तडवी)
रावेर येथील रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री. व्ही.एस.नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि रेड रिबन क्लब(RRC) यांच्या संयुक्त विद्यमाने एच.आय.व्ही. एड्स जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण रुग्णालय रावेर येथील आयसीटीसी विभाग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
कार्यक्रमात रावेर ग्रामीण रुग्णालय आयसीटीसी समुपदेशक श्री. महेंद्र सुरवाडे यांनी विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही. एड्सविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी या रोगाची कारणे, लक्षणे, आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन केले.
यासोबतच, आयसीटीसी समुपदेशक श्री.सुनील महाजन यांनीही विद्यार्थ्यांना एड्सबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील विविध शंकांचे निरसन करून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये या विषयाबद्दलची जागरूकता अधिक वाढली.
सदर कार्यशाळा ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .कार्यशाळेला उपप्राचार्य डॉ.एस डी.धापसे अध्यक्षस्थानी होते.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर महाजन आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एल.एम. वळवी यांनी संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन केले. एच.आय.व्ही. एड्स जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.