Ankush tv18 news network
Jalgaon ( Raver )
दि.०७/१०/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. सुमारास श्री पो.नि राहुल गायकवाड यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली की, एक इसम सहस्वलिग ता. रावेर गावी त्याचे शेतात अवैधररित्या गांजासदृश अंमली पदार्थाची बेकायदेशीरपणे लागवड केलेली आहे. तरी त्याचेवर कारवाई करणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडिल पोउपनि श्री सोपान गोरे व पोलीस अंमलदार याचे पथक तयार करून सदर ठीकाणी कार्यवाई करण्याचे सूचना देवून सदरचे पथक सहस्वलिग ता. रावेर गावी जावुन मिळालेल्या बातमीची खात्री करुन त्याच्यावर छापा टाकला असता सदर इसमाच्या शेतात २५ किलो वजनाचा १,७०,०००/- रुपये किमतीचा कैनाबीस (गांजा) लागवड केलेली असल्याची मिळुन आले असता त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लागवड केलेल्या इसमाचा शोध त्यास ताब्यात घेतले तेव्हा इसम महेरबान रहेमान तडवी वय-३२ रा. सहस्वलिग ता. रावेर यास मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असुन, रावेर पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशन CCTNS गु.र.क्रं. ४२२/२०२५ NDPS १९८५ चे कलम ८(क), २० (य) (२) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.डॉ.श्री. महेश्वर रेड्डी सो., पोलीस अधीक्षक, जळगाव, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राहुल गायकवाड़, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, श्री विशालस जैस्वाल पोलीस निरीक्षक, रावेर, पोउपनिरी सोपान गोरे, पोहवा संदीप चव्हाण, यशवंत टहाकळे पो.अं प्रदिप सपकाळे, बबन पाटील, सचिन घुगे, मयूर निकम, चापोहेको भरत पाटील सर्व नेम. स्थानीक गुन्हे शाखा जळगाव, यांनी केली आहे तसेच रावेर पोलीस स्टेशन कडिल सपोनि श्रीमती मीरा देशमुख, पोहेको ईश्वर चव्हाण, पो. अं संभाजी बौजागरे, राहुल परदेशी नेम. रावेर पोलीस स्टेशन यांच्या पथकाने सदर कारवाई करिता मदत केली असुन दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि मनोज महाजन नेम रावेर पोलीस स्टेशन हे करित आहे.