Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » “शेतकऱ्यांना उर्वरित कापूस विक्रीसाठी अडचणी येऊ नयेत व योग्य भाव मिळावा, म्हणून C.C.I. ने नोंदणी करून एकरी १५ क्विंटलपर्यंत कापूस खरेदी करावा.”या मागणीवर प्रतिसाद देताना मा. खासदार अनुप दादा धोत्रे यांनी दिले आश्वासन

 “शेतकऱ्यांना उर्वरित कापूस विक्रीसाठी अडचणी येऊ नयेत व योग्य भाव मिळावा, म्हणून C.C.I. ने नोंदणी करून एकरी १५ क्विंटलपर्यंत कापूस खरेदी करावा.”या मागणीवर प्रतिसाद देताना मा. खासदार अनुप दादा धोत्रे यांनी दिले आश्वासन

Trending Photos

Ankush tv18 news network

अकोला प्रतिनिधी :
अकोला जिल्ह्यातील मुख्य पिकांमध्ये कापूस हे प्रमुख पीक असून, यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, C.C.I. (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कडून नियमानुसार एकरी केवळ ५.५ क्विंटल कापूस खरेदी केला जाईल असे सांगण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजप कार्यकर्ते प्रवीण शेतकरी (प्रवीण डिक्कर) यांनी मा. खासदार अनुप दादा धोत्रे यांच्याकडे निवेदन देत मागणी केली की,    “शेतकऱ्यांना उर्वरित कापूस विक्रीसाठी अडचणी येऊ नयेत व योग्य भाव मिळावा, म्हणून C.C.I. ने नोंदणी करून एकरी १५ क्विंटलपर्यंत कापूस खरेदी करावा.”या मागणीवर प्रतिसाद देताना मा. खासदार अनुप दादा धोत्रे यांनी आश्वासन दिले की,

“शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही. शेवटच्या कापसाच्या बोंडापर्यंत C.C.I. मार्फत खरेदी होण्यासाठी मी प्रयत्न करीन,”  असे खासदार धोत्रे यांनी सांगितले.    शेतकऱ्यांमध्ये या आश्वासनामुळे दिलासा निर्माण झाला असून, शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा