Ankush tv18 news network
अकोट. निळकंठ वसू पाटील तालुका प्रतिनिधी…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून नगर परिषद मुख्याधिकारी कार्यालय व अकोट जीवन प्राधिकरणाच्या कार्यलाय समोर पिण्याच्या पाण्याचे मडके फोडून निषेध नोंदवला तशेच राजेंद्र नगर भागात दहा दहा दिवस नळ येत नाही त्यासाठी केले मोठे आंदोलन नगर परिषद प्रशासनाने घेतले झोपेचे सोंग तशेच प्रभाग क्र १० व अकोट शहरातील इतर भागात ज्या जागा अतिक्रमणित आहेत सन २०११ च्या अगोदर पासून ज्या लोकांची वास्तव्य त्या अतिक्रमण जागेत अशा लोकांची जागेची सण २०११ च्या अगोदरचे संपूर्ण पुरावा वे सहित अर्ज सादर केले आहेत सदर जागा शासनाच्या जीआर नुसार ती जागा नियमाकुल करून देण्यात यावी तसेच त्या जागेवर त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा याकरिता शेकडो लोकांनी निवेदने व अर्जे आपल्या कार्यालयात दिली आहेत परंतु अद्याप पर्यंत असे जाणीव झाले की आपण मुद्दामून त्रास देण्याच्या उद्देशाने आपण ती कामे करत नाहीत व न प ची कुठलीही मानसिकता काम करण्याची दिसत नाही त्यामुळे आज आम्ही आजपर्यंत दिलेले सर्व अर्ज आपण आम्हाला परत देणे द्यावी कारण संपूर्ण अकोल्या जिल्ह्या मध्ये घरकुल करण्याकरिता बाकीच्या नगरपालिकेमध्ये सर्व प्रक्रिया सुरू आहेत आणि बऱ्याच जागी नियमाकुल झाले आहेत तरी सुद्धा बाकी न प अकोट अजुनही बाकी आहे त्यामुळे आमच्या फाईली, अर्ज आम्हाला परत द्यावे त्यांनतर सर्व लाभार्थी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयात ते अर्ज देणार आहे तसेच अकोट येतील राजेंद्र नगर येथे आठ ते दहा दिवस पाण्यात पिण्याचे पाणी लोकांना मिळत नाही सध्या पावसाळा संपत आहे जर पावसाळ्यात पिण्याचे पाण्याचा पुरवठा होत नसेल तर हिवाळ्यात व उन्हाळ्यात काय परिस्थिती राहणार याची जाणीव प्रशासनाला दिसत नाही मी पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे पूर्वी वारंवार सूचना दिल्या परिस्थिती सांगितली की या भागात १५० मीटर नवीन पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे त्याचे इष्टीमेंट सुद्धा न प मध्ये दिले परंतु पैसे नाही म्हणून नगर पालिकेचे अधिकारी टाळाटाळ करीत आहे आपण टॅक्स वाडीव च्या नावाखाली कोटि रुपयांची वसुल केली आहे मग तो पैसा गेला कुठे ? परंतु जे लोक नेहमी टॅक्स भरतात त्यांच्या करिता विकास म्हणून चार पाच लाख रुपये सुद्धा त्यांच्या विकासासाठी खर्च होताना दिसून येत नाही त्याकरता आम्ही आज नगर परिषद व जिवन प्राधिकरण विभागाचा जाहीर निषेध करण्यात आला व सात दिवसा नंतर हजारो लोक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून आंदोलन करण्यात येणार असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी प्रामुख्याने राम अंभोरे पप्पू थोरात जाणी अंभोरे गुडू शेंगोकार गजानन कांगळे राहुल शिवरकार प्रकाश बरेठिया आकाश अंभोरे दिलीप सिडाम योगोश अंभोरे लक्ष्मी नारायण मंडले आनंद शिवरकार राहुल अंभोरे भिकू गटकल शिवा अंभोरे मारोती शिवरकार मुरली अंभोरे रवी अंभोरे विजय कंगळे संतोष अंभोरे मनोज अंभोरे गजानन शिवरकार विजय शिवरकार सतिस अंभोरे सौरभ अंभोरे रोहोन अंभोरे शंकर शिवरकार संकेत जाधव अविनाश बांकुवले अविनाश तसतोडे यांच्यासह शेकडो नागरिक महिला उपस्थित होते