Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » शालेय मुलाने ChatGPT ला मित्राची गंमत करण्यासाठी असा प्रश्न विचारला की शाळेतून थेट तुरुंगात रवानगी झाली

शालेय मुलाने ChatGPT ला मित्राची गंमत करण्यासाठी असा प्रश्न विचारला की शाळेतून थेट तुरुंगात रवानगी झाली

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

Ankush tv18 new network

न्यूज कॅनडाच्या बातमीनुसार

मुलाने ChatGPT ला असा प्रश्न विचारला की शाळेतून थेट तुरुंगात रवानगी झाली
या घटनेने शाळा प्रशासनच नव्हे तर संपूर्ण समाजाला विचार करण्यास प्रवृत्त केले आहे की मुलांनी तंत्रज्ञानाची वापर करण्या संदर्भात किती सतर्कता राखली

न्यूज कॅनडाच्या बातमीनुसार हा प्रकार डेलँड शहरातील साऊथ वेस्टर्न मिडिल स्कूलचा आहे. येथील सातवीत शिकणाऱ्या एका मुलाने वर्गात असतानाच ChatGPT वर अशा प्रश्न टाईप केला की त्याने त्याला जन्माची अद्दल घडली. काय नेमके घडले.

आज काल आपण कोणतीही छोटी – मोठी माहिती विचारण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) वर अवलंबून असतो. कोणत्या प्रश्नाचे उत्तर हवे असेल वा कोणत्या समस्येवर उपाय हवा असेल तर आपण प्रश्न विचारता एआय आपल्या काही सेकंदात उत्तर देत असतो. परंतू या तंत्राचा विधायक आणि विघातक असा दोन्ही प्रकारे उपयोग होण्याचा धोका असतो. त्यामुळे अनेकदा लोक अडचणीत येतात. असाच काहीसा प्रकार एका शालेय मुलाच्या बाबत घडला आहे.

अनेकदा आपण स्मार्ट दिसावे यासाठी अनेक गोष्टी इंटरनेटवर सर्च करत असतो. ज्या गोष्टी चुकीच्या असतातच प्रश्न धोकादायक देखील सिद्ध होऊ शकतात. काही जण गुन्हेगारीबद्दलची माहिती एआयला विचारतात. त्यांना काही तरी चमत्कारीक उत्तर मिळेल अशी आशा असते. परंतू अशा प्रकारे प्रश्न विचारणे कधी-कधी महागात पडू शकते अशी घटना उघडकीस आली आहे.

कोणते आहे हे प्रकरण ?
असाच प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात राहणाऱ्या एका १३ वर्षांच्या मुलासोबत घडला आहे. हा शालेय आता या चुकीची शिक्षा भोगत आहे.Yaho

या विद्यार्थ्याने ChatGPT वर मी माझ्या मित्राला कसे मारु शकतो ? असा प्रश्न विचारला. त्यानंतर या प्रश्नामुळे शाळा आणि पोलीस दोन्ही हादरले. या मुलाने जसा हा प्रश्न विचारला तसे लागलीच शाळेतील डिजिटल मॉनिटरिंग सिस्टम सक्रिय झाली. या सिस्टीमने ताबडतोब शाळा प्रशासन आणि पोलीसांना अलर्ट पाठवला. काही वेळातच शाळेत पोलीस दाखल झाले.त्यांनी तपास सुरु केला.

काय होता हेतू ?
चौकशीत असे उघड झाले की या मुलाला कोणालाही नुकसान पोहचवयाचा हेतू नव्हता. त्याने सांगितले की त्याला त्रास देणाऱ्या एका आपण सहज मजेत काही तरी मजेशीर उत्तर येते हे पाहण्यासाकरत हे करत होता. त्याने विचार केला ChatGPT वर काही तरी मजेशीर उत्तर मिळाल्यानंतर आपण आपल्या सहकाऱ्याला चिडवू यासाठी यासाठी हा उद्योग केल्याचे सांगितले.

परंतू पोलिस आणि शाळा प्रशासनाने यास गंभीरतेने घेतले. मुलगा जरी मस्करी करत होता. तरी त्याचे असे वागणे संभाव्य धोक्याकडे इशारा करते. त्यामुळे यास हलक्यात घेता येत नाही असे सांगतले. या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरु आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा