ANKUSH TV18 NEWS
प्रा. डी सी पाटील
नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
शहादा : येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र महाराष्ट्र राज्य तर्फे करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा व संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
मंडळाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान प्रसंगी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले. या व्याख्यानास प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र वीज वितरण कंपनी शहादाचे उप कार्यकारी अभियंता ज्ञानेश बागुल उपस्थित होते. त्यांच्यासोबत ब्राह्मणपुरी विभागाचे उपअभियंता योगेश जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्यानास उपस्थित होते. उद्घाटक म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. डी.सी. पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. के. पटेल होते. या मार्गदर्शनपर व्याख्यानात महाविद्यालयातील 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
व्याख्यानात मुख्य मार्गदर्शक ज्ञानेश बागुल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वातावरण कसे असावे, अभ्यास कसा करावा, अभ्यासासाठी लागणारा आत्मविश्वास कसा मिळवावा, स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी आवश्यक असलेली नियोजन करण्यासाठी महत्त्वाची टिप्स विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्या. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतांना त्यांनी ‘पॉवरफुल पीपल डू नॉट कम फ्रॉम द पावरफुल प्लेस, पावरफुल पीपल मेक पॉवरफुल प्लेस’ अशी सुरुवात करत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.
श्री. जाधव यांनी विद्यार्थ्यांशी अभ्यासासंबंधी आवश्यक स्ट्रॅटेजी कशी आखावी आणि त्यानुसार शिस्तबद्धता पाळण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले.
प्रा. डी. सी. पाटील यांनी महाविद्यालयातील अनुभव व्यक्त करत असतांनाच विद्यार्थ्यांचे कर्तव्य हे अभ्यास करण्याचे असून या वयातच ध्येय निश्चित करत स्वतःचं, महाविद्यालयाचं समाजाचं व पालकांचं स्वप्न पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे असे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम के पटेल यांनी महाविद्यालय हे सदैव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाठीशी आहे. तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासाठी व या परिसराच्या विकासासाठी स्व.अण्णासाहेबांच्या तत्त्वावर मार्गक्रमण करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. खुमानसिंग वळवी यांनी महाविद्यालयामार्फत स्पर्धे परीक्षा संबंधी आवश्यक त्या सोयीसुविधा काय आहेत व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी महाविद्यालय सपोर्ट म्हणून कसे उपलब्ध आहे याची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ.वजीर अशहर यांनी केले व आभार डॉ.गजानन पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅप्टन एस. एल. भालेराव, डॉ. पी. आर. तोरवणे, प्रा. एस . एस. पवार डॉ. आर. एस. माळी यांनी सहकार्य केले. यावेळी प्रा. डॉ.जी.बी. कुवर, डॉ. यशवंत शिरसाठ, डॉ. तुषार पटेल, प्रा. मोहसीन पठाण, प्रा. भटू कुवर व इतर प्राध्यापक उपस्थित होते. या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत केली.
स्पर्धा परीक्षा व संधी’ याविषयी व्याख्यान आयोजन केल्याबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूर पाटील यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.