ANKUSH TV18 NEWS NETWORK
व्ही. एल. चंदेल सरकारी वकिलाने न्यायालयातच घेतला गळफास; कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी मोठा द्विस्ट…
बीड: वडवणी येथील न्यायालयात सत्काराच्या शालनेच गळफास घेत सरकारी वकिलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या सरकारी वकील व्ही. एल. चंदेल यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
चंदेल कुटुंबीयांनी म्हटले आहे की, ‘व्ही. एल. चंदेल यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता, त्यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेली चिड्डी पोलिसांनी आम्हाला दाखवली नाही. त्या चिठ्ठीत नेमका काय उल्लेख आहे, तो आम्हाला माहि नाही. परंतु, की कुणी यात दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या संपूर्ण आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.’
दरम्यान, वडवणी पोलिसांनीही चिठ्ठी मिळाल्याचा दुजोरा दिला आहे. मात्र, चिड्डीसंदर्भात आत्ताच माहिती देता येणार नाही, असे म्हटल्याने चंदेल यांच्या मृत्यू गूढ आणखी वाढले आहे. चंदेल हे स्वभावाने अतिशय चांगले मनमिळाऊ होते, ते असे काही करणार नाहीत, त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता असे त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते. त्यामुळे सरकारकडून याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, तसेच, त्यांच्या कुटुंबीर आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. व्ही.एल. चंदेल यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांच्या मागणीनंतर मोठा द्विस्ट आला आहे.