Jalgaon ( Mrs.Bharti sarwane )
दि.०१/०८/२०२५ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ७० वर्षीय वृध्द ईसम कालीका माता मंदीर समोरुन महामार्गावरुन पायी जात असतांना एक चारचाकी वाहन त्यांच्या जवळ थांबुन चारचाकी वाहनातील अज्ञात दोन इसमांनी सदर वृध्दास पुढे चौकात सोडतो असे गोड बोलुन चारचाकी वाहनात मागे सिट खराब असल्याचा बहाना करुन पुढील शिट वर दाटीवाटी करुन बसविले. थोडे अंतर पार केलेवर सदर वृध्दास खाली उतरवुन दिले. खाली उतरले नंतर आपल्या खिशातील २५,०००/- रु रोख रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आलेवर त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठुन झालेली हकीकत सांगितले. श्री बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी सदर वृध्द ईसमास धिर देवुन झालेल्या घटनेची विचारपुस करुन तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफी विजयसिंग पाटील, पोहेकों गणेश शिरसाळे, पोहेकों प्रमोद लाडवंजारी, पोहेकों किरण चौधरी यांना तात्काळ घटनास्थळी रवाना करुन सिसिटीव्ही द्वारे शोध घेवुन गोपनीय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करुन आरोपीतांचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या व फिर्यादी यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन CCYNS गुरन ५६२/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वर नमुद गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळावरील उपलब्ध व नेत्रम विभागचे पोकों मुबारक देशमुख यांच्या मदतीने सिसिटीव्ही फुटेज प्राप्त करुन संशयित आरोपींतां बद्दल माहिती मिळवली. सदर पथकाने तात्काळ गुन्हा करणारे आरोपीतांचा शोध घेवुन गेंदालाल मिल परिसर जळगाव येथे सापळा रचुन संशयित आरोपी नामे १. अर्शद शेख रज्जाक शेख वय ३२, रा. गेंदालाल मिल जळगाव व २. अताउर रेहमान मोहम्मद शकील वय ३५, रा. गेंदालाल मिल, जळगाव यांना शितफीने ताब्यात घेवुन सखोल चौकशी करीता त्यांनी सदर चोरीची कबुली देवुन चोरी केलेला मुद्देमाल २५,०००/- रु रोख रक्कम आरोपीतांकडून जप्त केले. तसेच गुन्ह्यात वापरलेले सुमारे २,००,०००/- रु किमतीचे स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आले आहे.
सदर आरोपी नामे १. अर्शद शेख रज्जाक शेख वय ३२, रा. गेंदालाल मिल जळगाव व २. अताउर रेहमान मोहम्मद शकील वय ३५, रा. गेंदालाल मिल, जळगाव यांना गुन्ह्याकामी अटक करण्यात आले असुन मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीतांना ०३ दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकों संजीव मोरे, एमआयडीसी पोस्टे जळगाव हे करीत आहे. सदरच कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते सो, पोलीस उप अधीक्षक श्री संदीप गावीत सो यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात आली आहे.