Ankush tv 8 news network
भुसावळ
भुसावळ येथील २५.४२ लाखांच्या लुटीचा अवघ्या ४८ तासांत छडा, ड्रायव्हरच निघाला मुख्य सूत्रधार, ०६ आरोपी अटके , २३.४२ लाख रुपये जप्त

भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गाजलेल्या २५.४२ लाख रुपयांच्या लुटीच्या गुन्ह्याचा (गुरनं. २०७/२०२५) अवघ्या ४८ तार्सात पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात, फियांदी मोहम्मद यासीन ईस्माइल हे ज्या कंपनीत (रॉयल कंपनी) खाजगी नोकरी करतात, त्याच कंपनीचा ड्रायव्हर, शाहीद बेग, हाच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी शाहीद बेगसह एकूण ०६ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून लुटीच्या रकमेपैकी २३,४२,०००/- रुपये रोख आणि ०३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
घटनेची हकीकतः-
दि.२८/१०/२०२५ रोजी रात्री २२:२० वाजता फिर्यादी मोहम्मद यासीन हे त्यांच्या कार्यालयातील २५,४२,०००/- रुपये एका बंगेत घेऊन मोटार सायकलने (एमएच-१९-बीसी-५५८६) घरी जात होते. मौजे खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणा-या कच्चा रस्त्यावर, तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या चालत्या मोटार सायकलला धक्का दिला. फिर्यादीचा तोल गेल्यानंतर, आरोपींनी मोटार सायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशाची बंग बळजबरीने हिसकावली व ते मोटार सायकलवर बसून पळून गेले.
याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासाची चक्रे आणि गुन्ह्याची उकल:-
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात फिर्यादीचा ड्रावकर शाहीद वेग याच्यावर संशय बळावला, चौकशीत, शाहीद बेगने गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली. शाहीद बेग हा फिर्यादीच्याच कंपनीत ड्रायव्हर असल्याने, त्याला पैशांच्या ने-आण करण्याच्या वेळेची माहिती होती.
कट रचणारेः- त्यानेच अकाऊंटंट यासीन शेख यांच्याकडे पैसे असल्याची टिप’ त्याचे साथीदार मुजाहीद
मलोक आणि मोहम्मद दानिश यांना दिली.
गुन्हा करणारेः- मुजाहीदने हा प्लॅन रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अजहर फरीद मलक, अमीर खान
युनुस खान आणि इंजहार वेग इरफान वेग यांना सांगितला. घटनेच्या रात्री, या तिघांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन लुटीचा गुन्हा केला.
तपासात असेही निष्पन्न झाले की, आरोपीनी संगनमत करून कट रचून दरोडा टाकला आहे, त्यामुळे गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२) (दरोडा) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
पोलिसांनी दि.३१/१०/२०२५ रोजी सर्व ०६ आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. मुख्य सूत्रधार ड्रायव्हर -शाहीद बेग इब्राहिम वेग रा. भुसावळ
२. मुजाहिद आसौफ मलीक रा. भुसावळ) कट रचणारा
३. कट रचणारा -मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम रा. भुसावळ
४.प्रत्यक्ष लुटीतील आरोपी- अजहर फरीद मलक , रा. रसलपूर, ता. रावेर
५. प्रत्यक्ष लुटीतीलआरोपी- अमीर खान युनुस खान
६. प्रत्यक्ष लुटीतील आरोपी -ईजहार बेग इरफान बेग रा. रसलपूर, ता. रावेर
गुन्हेगारी पार्श्वभूमी :-
आरोपीपैकी काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी क्र. १) शाहीद वेग याच्यावर मलकापूर शहर, बोराखेडो आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केवल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी क्र. ५) अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपासः-
गुन्हेगारी पार्श्वभूमी :-आरोपींपैकी काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी क्र. १) शाहीद वेग याच्यावर मलकापूर शहर, बोराखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केबल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी क्र. ५) अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.
पुढील तपास:-
आरोपीकडून लुटीच्या रकमेपैकी २३,४२,०००/- रुपये जप्त करण्यात आले असून, उर्वरित २,००,०००/-रुपयांची रक्कम हस्तगत करणे बाकी आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करणे आणि गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी, पोलिसांनी सर्व आरोपींना मा. न्यायालयाने दि.०३/११/२०२५ पावेतो पोलीस कोठडी मंजुर केली असून सदरचा गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्री. महेश गायकवाड, भुसावळ तालुका पो.स्टे. हे करीत आहोत,
तपास पथकातील अधिकारी व अंमलदार :- उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत, भुसावळ उपविभाग, भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड, स्था.गु.शा. जळगांव, पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ, भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. पोलीस निरीक्षक श्री. महेश गायकवाड, भुसावळ तालुका पो.स्टे. यांच्या अधिनस्त पोलीस अधिकारी व अमलदार यांचे पथकातील श्रे.पो.उप.निरी. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गकाळे, पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, पो.हे.कॉ. प्रेमचंद सपकाळे, पो.ना.श्रीकृष्ण देशमुख, पो.ना. विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी, पो.कॉ. राहुल वानखेडे, पो.कॉ. ईश्वर पाटील, चापोहेको दर्शन ढाकणे सर्व नेम. स्था.गु.शा. जळगांव तसेच श्रीमती. पुजा अंधारे, पो.हे.कॉ. संजय तायडे, पोहेकों वाल्मीक सोनवणे, पाहेकॉ. सुधीर विसपुते, पो.हे.कॉ. जितु ठाकरे सर्व नेम. भुसावळ तालुका पो.स्टे., पोकॉ. योगेश माळी, पोकों, भुषण चौधरी, पो. कॉ. अमर अढाळे, पोकॉ. प्रशांत सोनार सर्व नेम. भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. पो.कॉ. प्रमोद पाटील नेम. रावेर पो.स्टे. यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.





