Home » ताज्या बातम्या » रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने विविध मागण्यासाठी पुणे महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन,

रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने विविध मागण्यासाठी पुणे महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन,

Trending Photos

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

 


रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते, यावेळी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या शिष्टमंडळांनी निवेदन सादर केले, यावेळी रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांना आयुक्तांनी सांगितले चर्मकार समाजाला हक्काचे घर देण्यासाठी मुंढवा येथे राखीव भूखंड घर बांधून देणार तसेच संत रोहिदास महाराज यांचा पुतळा जुनी जिल्हा परिषद चौकात फेब्रुवारी पर्यंत उभारण्यात येईल, कष्टकरी चर्मकार गठाई कामगारांना स्टॉल देण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात येईल, अशा मागण्यांचे आश्वासन आयुक्तांनी रिपब्लिकन चर्मकार महासंघ या संघटनेला दिला,
यावेळी रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड, विजय वरछाये, सुनील गायकवाड, सारिकाताई कांबळे, सुनील राठी, सुनील चराटे, अशोक ठवार, प्रभू उदपुरे, रवींद्र शिराळे, रमेश वाहाळ, लखन बेदरकर, बंडू पुरुषोत्तम, उमेश चराटे, रोहिदास थोरात, सिंधुताई शिरे, गौरी बशिरे, शालिकराम सरसरे, सुदर्शन बनसोडे, यांच्यासोबत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी उपस्थित होते,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा